का रात्रभर जागावे लागते टेकाडीतील नागरिकांना? वाचा 

सतीश घारड 
शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019

कन्हान पोलिस स्टेशनअंतर्गत चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. सोमवार (ता. 4) च्या मध्यरात्री टेकाडी वसाहतीमध्ये चोरट्यांनी पाच घरांमध्ये घरफोडी करण्याचा प्रयत्न केल्यानंतर बुधवारला स्थानिक प्रकाश ज्वेलर्स या सोन्या चांदीच्या दुकानात चोरट्यांनी रात्री 2 च्या सुमारास घराच्या बाहेरील लाइट बंद करून घरफोडी करण्याचा प्रयत्न केला. परंतु, घरातील मुलाला जाग आली आणि त्याने शेजाऱ्यांना फोन करून माहिती देत आरडाओरड केल्याने चोरट्यांचा प्रयत्न फसला.

टेकाडी (जि. नागपूर) : एकाच रात्री पाच घरफोडी प्रकरणानंतर टेकाडीवासींमध्ये दहशत निर्माण झालेली होती अशात दोन दिवस उसंत घेत पोलिसांच्या गस्तीवर स्थानिकांनी निर्भर राहायला सुरुवात केलेली होती. परंतु, घटनेच्या तिसऱ्याच दिवशी बुधवारला स्थानिक ज्वेलर्स दुकानांमध्ये रात्री दोनच्या सुमारास झालेल्या चोरीच्या प्रयत्नानंतर स्थानिकांनी चांगलाच धसका घेतलेला आहे. अशात पोलिस यंत्रणेसोबत ग्रामस्थांनीही जागते रहो चा पुकारा देत रात्रीला गावात गस्त घालायला सुरुवात केली आहे. 

कन्हान पोलिस स्टेशनअंतर्गत चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. सोमवार (ता. 4) च्या मध्यरात्री टेकाडी वसाहतीमध्ये चोरट्यांनी पाच घरांमध्ये घरफोडी करण्याचा प्रयत्न केल्यानंतर बुधवारला स्थानिक प्रकाश ज्वेलर्स या सोन्या चांदीच्या दुकानात चोरट्यांनी रात्री 2 च्या सुमारास घराच्या बाहेरील लाइट बंद करून घरफोडी करण्याचा प्रयत्न केला. परंतु, घरातील मुलाला जाग आली आणि त्याने शेजाऱ्यांना फोन करून माहिती देत आरडाओरड केल्याने चोरट्यांचा प्रयत्न फसला. परंतु, चोरटे पळ काढण्यात यशस्वी झाले. 

Image may contain: 3 people, people sitting, table and outdoor

दुसऱ्याच दिवशी सीसीटीव्ही कॅमेरात वाढ करून दुकान आणि घर सुरक्षित केलं असलं तरी ग्रामस्थांची मात्र झोप उडाली आणि नागरिकांनी रात्रीला गस्त घालण्याचा निर्धार केला. अख्खी रात्र हातात लाठ्याकाठ्या घेत गावात गस्त घालून जागते रहो चा सूर गावात निनादू लागलेला आहे. लहान मोठ्यांपर्यंत महिला मंडळदेखील सध्या दहशतीत असून युवा आणि वयस्क रात्र भरगस्तीत व्यस्त राहत आहेत. 

Image may contain: 2 people, people sitting

हंसराज राऊत आणि मनोहर ढगे यांच्या घरी चोरटे चोरी करण्यात यशस्वी झाले होते. हंसराज यांच्या घरून साधारणतः साठ हजारांचे सोने व रोकड लंपास करण्यात चोरांना यश आल्यानंतर त्याच रात्री मनोहर ढगे यांच्या घराची मागच्या दाराची कुंडी तोडून चोरांनी तीन हजार चोरी करून शेजाऱ्यांच्या घराच्या बाहेरील कुंढ्या लावून लंपास झाले त्याच रात्री इतर तीन घरी चोरी करण्याचा त्यांचा प्रयत्न फसलेला होता. हंसराज राऊत यांनी पोलिसात तक्रार केली मात्र इतरांची अद्याप तक्रार केलेली नाही.

Image may contain: 1 person, standing and shoes

टोरट्यांकडून स्प्रे चा वापर? 
गावात चोरीच्या उद्देशाने घुसणारे टोळीने येत असावे असा अंदाज आहे. चोरटे घरात शिरल्यानंतर कोणत्यातरी स्प्रे चा वापर करत असल्याची ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे. स्प्रे च्या वापरानंतर घरातील झोपलेल्या व्यक्तींना घरात काही घडत असल्याचे भान राहत नाही. याचा फायदा घेऊन चोरटे बिनधास्त चोरी करून आरामात निघून जात असावेत असा कयास बांधला जात आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Why do the citizens of Takedi have to stay up all night?