सुरत मधूनच 'इव्हीएम' का आणल्या? - प्रफुल पटेल

praful_patel_
praful_patel_

गोंदिया- राज्यात फक्त दोन ठिकाणी पोटनिवडणुका होत्या त्यामुळे बाहेरुन इव्हीएम मशीन मागवण्याची गरज नव्हती. तरीही सुरत मधुन इव्हीएम मशीन का मागवल्या असा प्रश्न राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केला. आज सकाळपासून भंडारा-गोंदिया लोकसभा पोट निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे. मात्र मतदान सुरु झाल्यानंतर काही वेळेतच इव्हीएम मशिन बिघाडाच्या तक्रारी येण्यास सुरवात झाली. त्याबाबत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

'इव्हीएम मशीन बाबत आम्ही आधीपासूनच सांशक होतो. आज सकाळी मतदान सुरु झाल्यानंतर इव्हीएमच्या तक्रारी यायला लागल्या. आतापर्यंत 34 ठिकाणी मतदान रद्द करण्यात आल्याची माहिती निवडणुक आयोगाकडून मिळाली आहे. त्याठिकाणी पुन्हा मतदान घेण्यात येणार आहे. जवळपास 34 ते 35 हजार मतदारांना पुन्हा मतदान करावे लागणार आहे असेही पटेल म्हणाले.

पटेल म्हणाले, 2000 मशीनपैकी जवळपास 300 मशीनमध्ये बिघाड आहे, भंडारा-गोंदियाचे तापमान सध्या 45 अंश सेल्सिअसच्या आसपास आहे. या उच्च तापमानामुळेच इव्हीएमच्या सेन्सरमध्ये बिघाड होत आहे असे कारण अधिकारी सांगत आहेत. परंतु ज्या ठिकाणी मतदान व्यवस्थित होत आहे तेथेही इव्हीएमच्या सेन्सरमध्ये असाच बिघाड होऊ शकतो अशी शंका त्यांनी उपस्थित केली. अशाप्रकारे बिघाड होत असल्यास इव्हीएमची विश्वासार्हता कशी मान्य करायची असा प्रश्नही त्यांनी केला.

प्रफुल पटेल यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे-

  • प्रत्येक विधानसभा क्षेत्रात ६० पर्यंत मशीन्स बंद पडल्या
  • ज्या मशीन्स मध्ये मतदान झाले त्या सुरक्षित राहतील असे कसे मानायचे ?
  • मशीन्स खराब होत राहिल्या तर निवडणूका गंमत होउन जातील
  • व्हीव्हीपॅट मध्ये जेवढ्या चिठ्ठीमध्ये काय छापलंय ते पहाव लागेल 
  • अखिलेश यादव यांचा फोन आला, कैराना मधील ३०० मशीन्स उत्तर प्रदेश मध्ये  खराब झाल्याचं सांगितलं आहे
  • परदेशा प्रमाणे बॅलेट वापरण्यावर पुन्हा एकदा विचार करावा
  • जो पर्यंत सर्व मशीन्स मधून पुन्हा मतदान होत नाही तो पर्यंत कुठलाही निकाल लावू नये
  • वीस ते पंचवीस टक्के मशीन्स बंद झाल्या आहेत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com