Video : जर्मनीची ही संशोधक काय शोधायला आली भारतात? वाचा... 

राघवेंद्र टोकेकर 
Saturday, 21 December 2019

2015 साली डॉ. कोरीना यांनी तेलंगणातील कोट्टूरच्या जिल्ह्यातील वाकाटक काळातील मंदिराचे दर्शन घेतले अन्‌ शिल्पशास्त्राच्या तज्ज्ञ डॉ. कोरीना वाकाटक संस्कृतीच्या प्रेमात पडल्या. त्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांनी वाकाटक काळातील रहस्यांचा शोध घेणे प्रारंभ केले.

नागपूर : डॉ. कोरीना वेसेल्स या जर्मनीच्या संशोधक... त्यांनी बर्लिन येथील हर्म्बोल्ट विद्यापीठातून आचार्य पदवी प्राप्त केली... "दी गॉड ऑफ डायरेक्‍शन' असा त्यांचा संशोधनाचा विषय होता. सध्या त्या बर्लिन येथील शासकीय संग्रहालयात कार्यरत आहेत. 1982 पासून शिल्पशास्त्राच्या अध्ययनासाठी त्या अनेकदा भारतात आल्या आहेत. मात्र, प्रथमच त्यांनी विदर्भाला भेट दिली. पण, कशासाठी? याची उत्सुकता मात्र लागली आहे.

वाकाटक घराण्यातील अनेक शिलालेख व ताम्रपट विदर्भात आढळून आले आहेत. विनोबा भावे यांच्या पवनार आश्रमात सापडलेले वाकाटककालीन शिल्प बघण्यासाठी जर्मनीतील शिल्पशास्त्राच्या तज्ज्ञ डॉ. कोरीना वेसेल्स-मेविसेन विदर्भात आल्या आहेत. त्यांनी गुरुवारी पवनार, मनसर व रामटेक येथील शिल्पांची पाहणी केली. येथील प्राचीन मूर्ती आणि ठेवा बघून त्याही अचंबित झाल्या. सुमारे पाचव्या व सहाव्या शतकात उदयाला आलेल्या या संस्कृतीने स्वतंत्र रूप प्राप्त केले असल्याचे डॉ. कोरीना म्हणाल्या. 

क्लिक करा - मुलीच्या अंगावर पाणी सांडल्यावरून चाकूहल्ला

2015 साली डॉ. कोरीना यांनी तेलंगणातील कोट्टूरच्या जिल्ह्यातील वाकाटक काळातील मंदिराचे दर्शन घेतले अन्‌ शिल्पशास्त्राच्या तज्ज्ञ डॉ. कोरीना वाकाटक संस्कृतीच्या प्रेमात पडल्या. त्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांनी वाकाटक काळातील रहस्यांचा शोध घेणे प्रारंभ केले. भारतीय मंदिरांची शिल्पकला व आतील मूर्तींची वैशिष्ट्ये शोधण्यासाठी मुख्यत: विदर्भात आले आहे. त्यांनी पवनार येथील विनोबा भावे यांच्या आश्रमातील श्रीकृष्णाच्या जीवनातील कथाप्रसंगांवर आधारित मूर्तींचे दर्शन घेतले. इतिहास संशोधक डॉ. चंद्रशेखर गुप्ता व शेषशयन देशमुख यांनी त्यांना महत्त्व समजावून सांगितले. या दौऱ्यात माधवी देशमुख सहभागी होत्या. 

अधिक माहितीसाठी - प्रियकराचा झाला अपमान; प्रेयसीने काढला चाकू 

शिल्पे काहीतरी सांगत आहेत...

येथील शिल्पे अतिशय साधी व सरळ असून प्रथमदर्शनी ती फार काही सांगत असल्याचे जाणवते. त्यांची केशरचना, वेशभूषा आणि डोळ्यांतील तेज वाकाटक काळातील महत्त्व विशद करीत असल्याचे डॉ. कोरीना म्हणाल्या. मूर्तीच्या हातातील कमळ आणि शस्त्र पाहून ती कोणाची आहे हे ओळखण्याचे तंत्र संशोधनाला वेगळी दिशा देत आहे. वाकाटक काळातील मूर्तीच्या मागची कल्पना नावीन्यपूर्ण असून, शिल्प जरी दीर्घकाळ टिकली नसली तरी त्यांची वैशिष्ट्ये राजवंशातील महत्त्व सांगत असल्याचे डॉ. कोरीना यांनी नमूद केले. 

Image may contain: 1 person

संशोधन अद्याप अपुरे

आठ दिशांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आठ देवांना "अष्टदिक्‍पाल' म्हटले जाते. या विषयावर डॉ. कोरीना यांचे जर्मनीत अनेक लेख प्रकाशित झाले आहेत. मात्र, पवनार येथील "अष्टदिक्‍पाल'च्या मूर्ती बघितल्यानंतर आपले संशोधन अद्याप अपुरे असल्याचे वाटते. पवनारमधील गंगेच्या मूर्तीने आपले लक्ष वेधून घेतल्याचे कोरीना म्हणाल्या. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: why German researcher came in Vidarbha?