का वाढले खाद्यतेलाचे भाव? जाणून घ्या

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नागपूर ः अवकाळी पावसामुळे सोयाबीन, भुईमुगासह तेलबिया पिकांचे नुकसान झाल्याने त्याचे आतापासूनच बाजारात परिणाम दिसू लागले आहेत. तेलाच्या दरात दिवाळीपासून तब्बल दोन रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. आयात तेलावरील शुल्क कमी न झाल्यास येत्या काळात हे दर असेच वाढत जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
अवकाळी पावसाने खरिपाचा हंगाम पूर्णपणे वाया गेला. सोयाबीन, भुईमूग, तसेच विविध डाळींची पिके वाया गेली आहेत. उडीद, मूगडाळ, काळी डाळ, तूरडाळ महाग झाली आहे. डाळींच्या दरात घसघशीत वाढ झाली. सोयाबीनला फटका बसल्याने त्याचा दणका तेलांच्या दराला बसला आहे. विविध प्रकारच्या खाद्यतेलांच्या दरात दिवाळीनंतर वाढ झाली आहे.


अवकाळी पावसाने पीक वाया गेल्याने त्याचा बाजारावर परिणाम सुरू झाल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. हा परिणाम पुढच्या काळात जास्त तीव्रतेने दिसायला लागेल, असे किराणा व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. खाद्यतेलाच्या दरातून हेच दिसते. भुईमूग, सोयाबीनसारखी पिके वाया गेल्याने त्याचा तेलाच्या उत्पादनावर परिणाम होईल. विदेशातून येणाऱ्या खाद्यतेलावर आयात शुल्क वाढलेले आहे. त्यातच पाकिस्तानसोबतच्या वादानंतर मलेशियातून येणाऱ्या वस्तूंवर आयात शुल्क वाढविल्याने मलेशियातून आयात होणाऱ्या तेल वस्तूंवर त्याचा परिणाम दिसणार आहे. त्यामुळे केंद्राने आयात शुल्काबाबत हस्तक्षेप करण्याची गरज निर्माण झाल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

घाऊक बाजारात सर्वाधिक विक्री असलेल्या सोयाबीन तेलाच्या किमती वाढलेल्या आहेत असे तेल व्यापारी अनिल अग्रवाल यांनी सांगितले.
मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि छत्तीसगड या राज्यात सर्वाधिक सोयाबीनचे उत्पादन घेतले जाते. पावसामुळे बाजारात सोयाबीनची आवक कमी झालेली आहे. दिवाळीनंतर बाजारात 25 ते 30 हजार पोते सोयाबीनची आवक होत असते. विद्यमान स्थितीत फक्त 2500 ते 3000 पोत्यांची आवक सुरू आहे. पावसाने हजेरी लावल्याने शेतातील पिकांचे झालेले नुकसान आणि सोयाबीन न वाळल्याने आवक कमी झालेली आहे. त्याचा फटका सोयाबीन तेल उत्पादन करणाऱ्या कारखान्यांवर पडला आहे. याचा शेंगदाणे, सरसू तेलाला कोणताच परिणाम झालेला नाही. गुजरातमधील शेंगदाणे उत्पादनावर पावसाचा परिणाम झालेला नसल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com