मैत्रिणीसोबत फिरणाऱ्याच्या जवळ चाकू कशासाठी?

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जुलै 2019

अमरावती : ती बाहेरगावाहून अमरावती शिकण्यासाठी आली. दोघेही एकाच महाविद्यालयात शिकत होते. परंतु दोघांना असभ्य वर्तन करताना पोलिसांनी पकडले. तेव्हा अल्पवयीन मुलाजवळ चाकू आढळला. मैत्रिणीसोबत दुचाकीने फिरताना चाकू कशासाठी बाळगला, हा प्रश्‍न अनुत्तरीत आहे.

तो शहरातील नागपुरीगेटहद्दीत अन्सारनगरात राहतो. काही महिन्यापूर्वीच दोघांची ओळख झाली. शहरात युवतींच्या छेडखानीसह त्यांना माथेफिरूंकडून रस्त्यावर होणारी मारहाण हा विषय गंभीर झाला आहे. त्यामुळे चिडीमार विरोधी पथकासह, दुचाकीने गस्त घालणाऱ्या दामिनी पथकाला अशा घटनांवर लक्ष्य ठेवण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले होते. शुक्रवार (ता. 26) ला रात्री सवाआठच्या सुमारास दामिनी पथक आकाशवाणी केंद्राजवळून जात असताना, अंधारात एक मुलगा आणि मुलगी त्यांना असभ्य वर्तन करताना दिसले. त्यांनी दोघांनाही चौकशीसाठी फ्रेजरपुरा ठाण्यात बोलाविले. दोघेही अल्पवयीन होते. त्यापैकी पोलिसांनी मुलाची झडती घेतली असता, त्याच्याजवळ धारदार चाकू आढळला. त्यामुळे त्याच्याविरुद्ध आर्मऍक्‍ट अन्वये फ्रेजरपुरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पीडित मुलीच्या पालकांना घटनेची माहिती दिली.
मोठा अनर्थ टळला
सद्य:स्थितीत शहरात घडणाऱ्या घटना लक्षात घेता, पोलिसांनी वेळीच कारवाई करून युवक, युवतीस चौकशीसाठी ताब्यात घेतले नसते, तर मोठा अनर्थ घडण्याची शक्‍यता अधिक होती.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Why knife around with a girlfriend?