लीलाबाई वासनिक हिची हत्त्या कशासाठी ? गुढ कायम

file
file

कुही (जि.नागपूर) ः तालुक्‍यातील वेलतूर पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या डोंगरमौदा येथे रविवारी एका महिलेचे जळालेले मृत अवशेष आढळले. याप्रकरणी चौकशी करण्यासाठी डोंगरमौदा येथील राजेश सोनटक्‍के यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी एकास घेतले चौकशीकरिता ताब्यात
लीलाबाई सूर्यभान वासनिक (वय 64) ही शेतकरी महिला मागील सोमवारी धानमळणीसाठी डोंगरमौदा येथे मुलगा राहुलसोबत आली. मंगळवारी धान मांढळ येथील राइसमिलवर तिने मुलगा राहुलसोबत आणले. सायंकाळी ती पुन्हा डोंगरमौद्याला आली. त्या रात्री तिने डोंगरमौदा येथे मुक्काम केला. त्यानंतर आई चार दिवसांपासून घरी का आली नाही, म्हणून नागपूरवरून मुलगी पिंकी व अनिता डोंगरमौदा येथे आल्या. त्यांनी शेतात शोध घेतला असता तिथे धानाच्या तणसाजवळ मानवी शरीराची हाडे, केस व डोक्‍याची कवटी काही अंतरावर आढळली. हा विचित्र भयानक प्रकार पाहून दोन्ही मुली खूप घाबरल्या. त्यांनी ही माहिती नातेवाइकांना दिली. पोलिसांना माहिती मिळताच वेलतूरचे ठाणेदार आनंद कविराज ताफ्यासह दाखल झाले. संपूर्ण घटनास्थळ व परिसराची पाहणी केली. हे मृत अवशेष लीलाबाईचेच आहेत. कारण शेत आमचे आहे. चप्पल व बांगड्याही आमच्या आईच्याच आहेत, असे लीलाबाईची मुलगी पिंकी व अनिताने पोलिसांना सांगितले. दरम्यान, लीलाबाईचा मुलगा राहुल याचा राजेश सोनटक्‍केशी जनावरे शेतात चारण्यावरून वाद झाला होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली, म्हणून अधिक चौकशीकरिता राजेशला ताब्यात घेतले आहे. प्रकरणासंबधी विचारपूस सुरू आहे.

हत्तेमागचे कारण काय?
हे मृत अवशेष लीलाबाईचेच आहेत का, आहेत तर तिला कोणी मारले, कसे मारले, कशासाठी मारले, या प्रश्‍नांचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. उमरेडच्या पोलिस उपविभागीय अधिकारी पौर्णिमा तावरे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार आनंद कविराज यांनी घटनास्थळावर आढळलेली कवटी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शरीररचना विभागात तपासणीसाठी सोमवारी दिवसभर हजेरी लावली. तसेच डीएनए टेस्टचा रिपोर्ट आल्यानंतरच खरे काय ते समोर येईल, असे ठाणेदार कविराज म्हणाले. डोंगरमौद्यासह परिसरात या घटनेची चर्चा होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com