मुलीला सीटवर का बसू देत नाही? वडिलाची विद्यार्थ्याला मारहाण 

school bus
school bus

वर्धा : माझ्या मुलीला तू सीटवर का बसू देत नाही, असे म्हणून मुलीच्या वडिलांनी त्याच स्कूलबसमधून शाळेत जाणे-येणे करणाऱ्या चौथ्या वर्गातील मुलाला बसबाहेर ओढत जबर मारहाण केली. ही घटना समुद्रपूर तालुक्‍यातील वाशी येथे आज, गुरुवारी सकाळी घडली. 

मिळालेल्या माहितीनुसार, अमन रामकृष्ण आदमाने हा 10 वर्षांचा मुलगा आणि आरोपी वासुदेव लढी (रा. साखरा) याची मुलगी वासी येथील ज्ञानज्योती इंग्लिश स्कूलमध्ये चौथ्या वर्गात शिक्षण घेत आहे. दोघेही शाळेमध्ये एकाच स्कूलबसमधून जाणे-येणे करतात. आज, गुरुवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास कोरा येथील चौकात स्कूलबस थांबल्यानंतर मुलीचे वडील वासुदेव लढी याने स्कूलबसमध्ये बसून असलेल्या अमनला "माझ्या मुलीला सीटवर का बसू देत नाही', असे म्हणत बसबाहेर ओढत लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. 

घटनेची माहिती अमनच्या आई-वडिलांना मिळताच त्यांनी मुलाला वाशी येथील ज्ञानज्योती इंग्लिश स्कूलमध्ये नेत शिक्षकांना विचारपूस केली. अमनला जबर मार लागल्याने त्याला हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यासंबंधी स्कूलबस चालक राजेंद्र राऊत यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिस पुढील तपास करीत आहेत. 
 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com