पोलिसांनी पतीवर दाखल केला गुन्हा, व्यथित झालेल्या पत्नीने ठाण्यातच उचलले हे पाऊल...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 जानेवारी 2020

विषप्राशन केलेल्या पूजा आकाश करपे (वय २४, रा. शेणगाव)महीलेला रुग्णालयात घेऊन जाण्याचे सौजन्य जिवती पोलिसांनी दाखविले नाही. त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. घटना काल सकाळी ११.३० वाजताच्या सुमाराला घडली.  विषप्राशन करणाèया महिलेची आई अवैध दारूची विक्री करते, अशी गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी महिलेच्या घरी छापा टाकला. घरात दारुसाठा आढळून आला.

जिवती (जि. चंद्रपूर) : पतीवर पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप करीत पत्नीने पोलिस ठाण्यातच विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात घडली आहे.

विषप्राशन केलेल्या पूजा आकाश करपे (वय २४, रा. शेणगाव) महिलेला रुग्णालयात घेऊन जाण्याचे सौजन्य जिवती पोलिसांनी दाखविले नाही. त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. घटना काल सकाळी ११.३० वाजताच्या सुमाराला घडली.  विषप्राशन करणाèया महिलेची आई अवैध दारूची विक्री करते, अशी गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी महिलेच्या घरी छापा टाकला. घरात दारुसाठा आढळून आला.

गडचांदुरातील प्राथमिक रूग्णालयात उपचार सुरू
पोलिसांनी दारू साठा जप्त केला. ज्या महीलेचा घरी दारुसाठा आढळला त्या महिलेवर गुन्हा दाखल न करता पोलिसांनी तिच्या  जावई आकाश करपे यांच्यावर गुन्हाची नोंद केली.म दारू माझ्या घरात सापडली त्यामुळे मला अटक करा. कारवाई करा.यात माझ्या जावयाचा काहीच दोष नाही,माझ्या मुलीसोबत वेगळा  राहतोम अशी विनवणी सासूने ठाणेदाराकडे केली. मात्र  पोलिसांनी जावयावर गुन्हा दाखल केला.

दोष नसताना पतीवर गुन्हा दाखल झाला हे बघून व्यथित झालेल्या  पत्नीने पोलिस स्टेशन गाठले. पतीवर गुन्हा का दाखल केला असा जाब विचारीत  पत्नीने पोलिस ठाण्यातच विषप्राशन केले.ही घटना घडली तेव्हा  ठाणेदार हजर होते. विषप्राशन केलेल्या महीलेला तत्काळ रुग्णालयात नेण्याचे सौजन्य पोलिसांनी दाखविले नाही. सध्या ती गडचांदूर येथील रुग्णालयात उपचार घेत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: wife attempted suicide in police station