पत्नीने केली पतीच्या प्रेयसीची धुलाई 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

नागपूर : प्रेयसीला गाडीवर बसवून फिरविणाऱ्या पतीला पत्नीने भरचौकात अडविले. पतीच्या प्रेयसीच्या झिंज्या पकडून चांगली धुलाई केली तर प्रेयसीला पत्नीच्या प्रतापापासून वाचविण्याचा प्रयत्न केल्यामुळे पतीलाही चपलेने प्रसाद दिला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या प्रकरणाची नोंद तहसील पोलिसांनी घेतली. 

पतीसोबत वाद झाल्यामुळे आठ दिवसांपूर्वी पत्नी माहेरी आली. या दरम्यान पतीने संधी साधून प्रेयसीला घरी बोलावले. तिला सोमवारी सायंकाळी तहसील परिसरात दुचाकीने शॉपिंगला नेले. अग्रसेन चौकात भाऊ आणि मुलासह आलेल्या पत्नीला ते दोघेही दुचाकीने जाताना दिसले. महिलेच्या भावाने पाठलाग करून त्या दोघांनाही पकडले. अग्रसेन चौकात दोघांनाही दुचाकीवरून खाली उतरवले. युवतीबाबत पतीला विचारणा केली असता तो उत्तर देत नव्हता. पारा चढल्यानंतर पत्नीने पतीच्या प्रेयसीचे केस ओढून खाली पाडले आणि "दे दणा दण' धुलाई केली. प्रेयसी मार खाताना बघून बिचारा पती तिला वाचविण्यासाठी मधे पडला. त्यामुळे चिडलेल्या पत्नीने प्रेयसीला सोडले आणि पतीची चपलेने धुलाई करण्यास सुरुवात केली. "मला माफ कर, मी हिचा नाद सोडून देतो,' अशी विनवणी पती करीत होता. हा सर्व प्रकार अनेकांनी मोबाईलमध्ये कैद केला. हा व्हिडिओ गेल्या दोन दिवसांपासून चांगलाच व्हायरल होत आहे. या प्रकरणाची नोंद तहसील पोलिसांनी घेतली.

Web Title: wife beaten husband s girlfriend