esakal | प्रेमविवाहाचा करुण अंत; पतीच्या मारहाणीत पत्नीचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

प्रेमविवाहाचा करुण अंत; पतीच्या मारहाणीत पत्नीचा मृत्यू

प्रेमविवाहाचा करुण अंत; पतीच्या मारहाणीत पत्नीचा मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बल्लारपूर (जि. चंद्रपूर) : दोघांचेही एकमेकांवर जिवापाड प्रेम... त्यांनी सात जन्माच्या गाठी बांधल्या... मात्र, त्या गाठी फार काळ टिकू शकल्या नाही... अल्पकाळातच सुखी संसारात मिठाचा खडा पडला... दोघांमध्येही वाद वाढला आणि हा वाद जीव जाण्याइतपत विकोपाला गेला. सुषमा कंन्नाके (वय २३) असे मृत पत्नीचे नाव आहे. तर मनोज सुरेश कंन्नाके (वय २५, रा. किन्ही) असे आरोपी पतीचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, सुषमा व मनोज यांनी प्रेमविवाह केला होता. प्रेमविवाह केल्यानंतरही दोन्ही पती-पत्नीमध्ये क्षुल्लक कारणावरून एकमेकाशी वाद होत होते. भांडण झाल्यानंतर मनोज हा सुषमा हिला जबर मारहाण करायचा. घरगुती वादातून गुरुवारी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास दोघांमध्ये वाद झाला. यानंतर मनोजने सुषमा मारहाण केली. यात ती गंभीर जखमी झाली.

हेही वाचा: विजय वडेट्टीवार म्हणाले, एका बापाची अवलाद असशील तर...

तिच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान रविवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. अल्प काळात प्रेमविवाहाचा अंत झाल्याने किन्ही गावात मध्यरात्रीपासून स्मशान शांतता पसरली होती. फिर्यादी पोलिस पाटील अरुण नागोबा बुच्चे यांच्या तक्रारीतून पती मनोज कंन्नाके याला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, घटनेचा तपास साहाय्यक पोलिस निरीक्षक रमेझ मुलांनी करीत आहे.

loading image
go to top