पत्नी नांदायला येत नसल्यामुळे पतीने कापली हाताची नस

Suicide
Suicide

नागपूर - माहेरी गेलेली पत्नी नांदायला परत येत नसल्यामुळे पती राजेंद्र रामकिसन ढोले (३५, रा. कपिलनगर, नारी रोड) याने काचाने हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना जरीपटक्‍यात उघडकीस आली.

राजेंद्र ढोले हा मॅकेनिक असून, त्याला दारूचे व्यसन आहे. व्यसनामुळे घरात नेहमी खटके उडायचे. नेहमीच्या वादाला कंटाळून पत्नी एका वर्षांपूर्वी घर सोडून माहेरी गेली व न परतण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्याचे व्यसन अधिकच वाढले. पत्नी पाचपावलीत राहत असून, राजेंद्र नेहमी सासुरवाडीला जाऊन पत्नीला सोबत पाठवा, अशी गळ घालतो. मात्र, दारूचे व्यसन पाहता पत्नीचे आईवडील पाठविण्यास नेहमी नकार देतात. त्यामुळे तो काही महिन्यांपासून तणावात होता.

१ मे रोजी दुपारी तो सासुरवाडीत गेला आणि पत्नीला सोबत चलण्यास सांगितले. मात्र, पत्नीने नकार दिला. त्यामुळे त्याने घरी पोहचून ब्लेडने पायावर चिरे मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. सोमवारी तो पुन्हा सासुरवाडीत गेला. सासूने मुलीला पाठविण्यास स्पष्ट नकार दिल्याने त्याने पुन्हा घरी येऊन काचाने हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. आई रेखा यांच्या प्रकार लक्षात येताच त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने राजेंद्रला दवाखान्यात नेले. तसेच पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com