पतीच्या मृत्यूनंतर पत्नी बेपत्ता

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 डिसेंबर 2018

नागपूर - उपराजधानीत उपचारासाठी आलेला रुग्ण उत्तम शाहू (५५) यांचा नागपूर रेल्वेस्थानकावर मृत्यू झाला. स्वत:ला पत्नी सांगणारी राधा (४८) यांनी नातेवाइकांना घटनेची माहिती दिली. मात्र, ती बेपत्ता झाल्यामुळे पोलिसांपुढे नवा पेच उभा झाला आहे. पत्नीने सांगितलेल्या पत्त्यावरून पोलिसांनी मृताच्या नातेवाइकाचा शोध सुरू केला आहे.

शाहू मूळचा मध्य प्रदेशातील बोरदई येथील रहिवासी असून, कामानिमित्त शिर्डीत राहतो. काही दिवसांपासून तो हृदयरोगाने पीडित होता. राधाने दिलेल्या माहितीनुसार, ती व शाहू उपचारासाठी नागपुरात आले होते. बुधवारी रात्री नागपूर स्थानकावरच थांबले. जेवणावरून दोघांमध्ये वाद झाला. काही वेळातच शाहू छातीत दुखत असल्याची तक्रार करीत जमिनीवर कोसळला. घटनेची माहिती मिळताच उपस्टेशन व्यवस्थापक कार्यालयाकडून लोहमार्ग पोलिस व रेल्वे डॉक्‍टरांना सूचना दिली. डॉक्‍टरांनी शाहूला मृत घोषित केल्याने पोलिसांनी पंचनामा करीत मृतदेह मेयो रुग्णालयात पाठवला. राधाला शाहूबाबत फारशी माहिती देता आली नाही. काही वेळाने ती पसार झाली. तिने शाहूसंदर्भात दिलेल्या जुजबी माहितीवरून लोहमार्ग पोलिसांनी बोरदई येथील पोलिसांशी संपर्क साधून नातेवाइकांना शोधण्याबाबत सूचना केली.

Web Title: Wife missing after husbands death