मुंडीकोटा (जि. गोंदिया) : येथील एमजी नगरातील अनिल छत्रीलाल शेंडे (वय 30) यांच्या संशयास्पद मृत्यूचे गूढ अखेर उलगडले. पत्नी, सासू, सासरे व साळ्याने मिळून त्याचा गळा आवळून खून केल्याचे पोलिस तपासात उघड झाले. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.
अनिल शेंडे यांचा मंगळवारी ( ता. 25) सायंकाळी पाचच्या सुमारास संशयास्पद मृतदेह आढळला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. खून झाला असावा, अशी चर्चा होती. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच तिरोडा पोलिसांनी मृत अनिल याची पत्नी जलेबी, सासू सुशीला, सासरे भीमराज व साळा क्रिष्णा या चार जणांना फिर्यादी अमित शेंडे (वय 27, रा. गोंडीटोला, कुडवा) यांच्या तक्रारीवरून चौकशीसाठी ताब्यात घेतले.
चौकशीत या चारही जणांनी अनिलचा खून केल्याचे पोलिसांना सांगितले. मृत अनिल पत्नी जलेबी हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला व मुलांना मारहाण करीत होता. त्यामुळे सारेच त्रस्त होते. दरम्यान, सोमवारी ( ता. 25) रात्री 11. 30 च्या सुमारास नाळ्याच्या सहाय्याने आरोपी चौघांनीही अनिलचा गळा आवळला.
तो मृत्युमुखी पडल्याचे लक्षात येताच आत्महत्या केल्याचा बनाव करून त्याला फासावर लटकविले. मात्र, लहान मुलाच्या साक्षीने मृत्यूचे अखेर गूढ उकलले. यातील एका आरोपीला अटक करण्यात आली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक ढोके करीत आहेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.