अनैतिक संबंधातून पतीचा खून

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 डिसेंबर 2018

धामणगावरेल्वे : अनैतिक संबंधास अडथळा ठरत असल्याने व नेहमीच्या घरगुती भांडणास कंटाळून सावत्र वडील व पत्नीने पतीची हत्या केल्याची घटना पोलिस तपासात उघडकीस आली. दत्तापूर पोलिसांनी दोन्ही संशयित आरोपींना शुक्रवारी (ता. 28) अटक केली.

धामणगावरेल्वे : अनैतिक संबंधास अडथळा ठरत असल्याने व नेहमीच्या घरगुती भांडणास कंटाळून सावत्र वडील व पत्नीने पतीची हत्या केल्याची घटना पोलिस तपासात उघडकीस आली. दत्तापूर पोलिसांनी दोन्ही संशयित आरोपींना शुक्रवारी (ता. 28) अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्‍यातील गंगाजळी गावानजीकच्या ऊर्ध्व वर्धा प्रकल्पाच्या मुख्य कालव्यात एका 30 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह रविवारला (ता. 23) संध्याकाळी आढळला होता. त्याची ओळख धामणगाव येथील रहिवासी, अशी पटविण्यात आली. शरीरावरील जखमांवरून त्याचा खून झाल्याचा संशय असल्याने पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला. दादाराव मरसकोल्हे (वय 49) व मृताच्या पत्नीनेच त्याचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले. मृताचा सावत्र बाप दादाराव व मृताच्या पत्नीचे अनैतिक संबंध होते. घटनेच्या आदल्या दिवशी शनिवारी (ता. 22) मोरेश्वर हा दारू पिऊन घरी आला. नंतर दादारावने मागील दरवाजाने घरात प्रवेश केला. मोरेश्वर झोपल्याची खात्री करून रुमालाने गळा आवळला. पश्‍चात दोघांनी त्याचा मृतदेह दुचाकीवरून गंगाजळी शिवारात असलेल्या मुख्य कालव्यात टाकला. कालव्याला पाणी नसल्यामुळे मृतदेह वाहून गेला नाही. दादाराव मरसकोल्हे याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता अनैतिक संबंधास अडथळा व नेहमीच्या घरगुती भांडणास कंटाळून त्याने व त्याच्या सुनेने मिळून खून केल्याचे कबूल केले, असे पोलिस उपविभागीय अधिकारी अविनाश शिंगटे यांनी सांगितले.

Web Title: wife murdered husband