घरगुती कारणावरून पत्नीचा खून

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जुलै 2019

फुलसावंगी (जि. यवतमाळ) : येथून सात किलोमीटर अंतरावरील दराटी पोलिस ठाण्यांतर्गत शिरपुल्ली शिवारातील एका शेतात गुरुवारी (ता.25) रात्री पतीनेच पत्नीचा खून केल्याची घटना शुक्रवारी (ता.26) उघडकीस आली. संगीता सुदर्शन कपाळे (वय 27) असे मृताचे नाव आहे. सुदर्शन संभाजी कपाळे (वय 32, रा. राहुर, ता. महागाव) याने शिरपुल्ली शिवारात बटाईने शेत केले होते. त्यामुळे तो पत्नीसह आत्माराम गंगाराम चौधरी यांच्या शेतात सालगडी म्हणून काम करणाऱ्या त्याच्या भावाजवळच राहत होता. गुरुवारी रात्री पत्नी संगीताशी सुदर्शनचे घरगुती कारणावरून भांडण झाले.

फुलसावंगी (जि. यवतमाळ) : येथून सात किलोमीटर अंतरावरील दराटी पोलिस ठाण्यांतर्गत शिरपुल्ली शिवारातील एका शेतात गुरुवारी (ता.25) रात्री पतीनेच पत्नीचा खून केल्याची घटना शुक्रवारी (ता.26) उघडकीस आली. संगीता सुदर्शन कपाळे (वय 27) असे मृताचे नाव आहे. सुदर्शन संभाजी कपाळे (वय 32, रा. राहुर, ता. महागाव) याने शिरपुल्ली शिवारात बटाईने शेत केले होते. त्यामुळे तो पत्नीसह आत्माराम गंगाराम चौधरी यांच्या शेतात सालगडी म्हणून काम करणाऱ्या त्याच्या भावाजवळच राहत होता. गुरुवारी रात्री पत्नी संगीताशी सुदर्शनचे घरगुती कारणावरून भांडण झाले. त्यात त्याने तीक्ष्ण हत्याराने संगीताचा खून केल्याचे शुक्रवारी सकाळी उघडकीस आले. गावचे पोलिस पाटील व सरपंच यांनी दराटी पोलिस ठाण्यात माहिती दिली. त्यानंतर दराटीचे ठाणेदार पांडव व त्यांच्या पथकाने शिरपुल्ली येथे येऊन संशयित आरोपी म्हणून सुदर्शन कपाळे याला अटक केली आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wife's murder on domestic cause