मुलगा होत नाही म्हणून पत्नीचा छळ 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 डिसेंबर 2018

नागपूर - दोन मुलींना जन्म दिल्यानंतरही वंशाला दिवा म्हणून मुलगा होत नसल्यामुळे पत्नीचा अतोनात छळ करणाऱ्या पतीसह सासरच्या अन्य दोघांवर मानकापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पती मोहम्मद फजलू रहमान (39, उत्थाननगर श्रमिक सोसायटी, मानकापूर), सासरे मोहम्मद आरिफ रहमान (53) आणि चुलत सासरे मोहम्मद हबीब रहमान (51) अशी आरोपींची नावे आहेत. 

पीडित महिला नुसरत परवीन (वय 32) हिचा गेल्या 14 वर्षांपूर्वी मो. फजलू याच्याशी लग्न झाले होते. त्यावेळी आर्थिक परिस्थिती योग्य नसलेल्या फजलूने नुसरत हिच्या आईवडिलांकडून बक्‍कळ पैसा घेऊन स्वतःचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय थाटला. त्यांच्या संसारवेलीवर दोन मुली झाल्या. त्यानंतर त्याने मुलगा व्हावा, यासाठी अनेक डॉक्‍टरांची तसेच अंगारे धुपारे, भोंदूबाबांकडे न्यायला लागला. मोठ्या मुलीला वेडसर असल्याचे ठरवून तिला शाळेतून काढून टाकले. फजलूने मुलगा व्हावा, यासाठी पत्नीचा वारंवार गर्भपात करवून घेतला. तो नेहमी दुसरे लग्न करण्याची धमकी पत्नीला देत होता. तसेच पत्नीला जबर मारहाण करीत होता. पत्नी व दोन्ही मुलींना घरात कोंडून कुलूप लावून बाहेर जात होता. 

Web Title: Wife's persecution because there is no child