एसटी बसमधील 'वायफाय' गायब, मनोरंजनासाठी केलेला कोट्यवधींचा खर्च पाण्यात

wifi facility closed in st bus in yavatmal
wifi facility closed in st bus in yavatmal

यवतमाळ : राज्य परिवहन महामंडळाकडून दोन वर्षांपूर्वी प्रत्येक बसमध्ये वायफायची सुविधा करून दिली होती. त्यामुळे स्मार्ट फोनधारकांसाठी बसमध्ये मनोरंजनाची सोय झाली होती. मात्र, प्रवाशांना या बाबीची साथ औटघटकेची ठरली. काही महिन्यांतच 'वायफाय'चा बोजवारा उडाला. बसमधून 'वायफाय'चे डब्बेच गायब झालेत. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करून सुरू केलेली ही सुविधा बंद पडली आहे. 

दळणवळणाच्या साधनांपैकी विमान, रेल्वेमध्ये मनोरंजनाच्या सोयी उपलब्ध आहेत. खासगी बसमध्ये प्रवाशांच्या मनोरंजनासाठी विविध सुविधा देण्यात आल्या आहेत. त्यातुलनेत एसटी महामंडळाच्या बसमध्ये प्रवाशांसाठी कुठलीही सुविधा नव्हती. त्यामुळे महामंडळाने दोन-तीन वर्षांपूर्वी बसमध्ये 'वायफाय' सुविधा सुरू केली. त्यामुळे प्रवाशांना बसमध्ये मोफत मनोरंजनासाठी 'किवि' वायफायची सोय उपलब्ध झाली होती. त्याद्वारे बसमध्ये स्मार्टफोनधारक स्टोअर केलेले कार्यक्रम पाहून मनोरंजन करून घेऊ शकतो. यात बातम्या, चित्रपट, ध्वनीफित गाणे, दिसणारे गाणे, कथा, कादंबरी किंवा एखाद्या पुस्तकाचे वाचनही करू शकतो. लहान बालकांसाठी कार्टून, व्हिडिओ गेम, कॉमिक्‍स बुक्‍सची सुविधा उपलब्ध होती. महिलांसाठी सिरीयलची सुविधा होती. मात्र, काही दिवसात या सुविधेचा बोजवारा उडाला. रिस्टोअर करण्यात आले नसल्याने अनेक दिवस एकच एक कार्यक्रम प्रवाशांना पाहावे लागत होते. त्यामुळे प्रवासी कंटाळले. काही दिवस ही सुविधा प्रवाशांना योग्यप्रकारे मिळाली. काही दिवसातच ती 'नॉट अव्हेलेबल' झाली. परिणामी कोट्यवधी रुपये खर्च करून प्रवाशांसाठी देण्यात आलेल्या सुविधेचा बोजवारा उडाला. 

प्रशासनाचे दुर्लक्ष - 
जिल्ह्यात लांब पल्ल्याच्या जवळपास सर्वच बसमध्ये वायफाय सुविधा उपलब्ध करून दिली होती. त्यामुळे प्रवाशांना मनोरंजनाची सोय झाली होती. यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च प्रशासनाने केला. मात्र, काही महिन्यांतच याकडे दुर्लक्ष झाले. परिणामी सुविधा तर बंद झालीच, आता एसटी बसमधील वायफायच्या पेट्याही गायब झाल्या आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com