वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

तलाव, विहिरी, कूपनलिका आटल्या; प्राण्यांचा गावाकडे फेरफटका
रामटेक - सध्या विदर्भात उष्णतेची प्रचंड लाट आहे. उष्णतेमुळे अंगाची लाहीलाही करणाऱ्या दुपारच्या वेळेस रस्ते निर्मनुष्य होऊ लागले आहेत. तालुक्‍यातील तलाव, विहिरी, कूपनलिका आदीमधील पाण्याची पातळी खालावली आहे. नाले तर कधीचेच कोरडे पडले आहेत. अशा अवस्थेत जंगलातील वन्यप्राणी पाण्याच्या शोधात गावांकडे फेरफटका मारू लागल्याने ग्रामीण भागातील लोकांना जीव मुठीत घेऊन जगावे लागत आहे.

रामटेक तालुक्‍यात जंगलाचे प्रमाण मोठे आहे. तसेच तालुक्‍यात दोन अभयारण्ये आहेत. एक पेंच राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्प तर दुसरे मानसिंगदेव अभयारण्य. या संरक्षित जंगलाशिवाय ही जंगल मोठ्या प्रमाणात आहेत.

देवलापार, पवनी, हिवरा बाजार, भंडारबोडी, गुगुलडोह, मांद्री या भागात जंगल आहे. जंगलात वन्यप्राणी मोठ्या संख्येने आहेत. हरिण, नीलगाय, कोल्हे, रानडुक्कर, ससे, मोर असे वन्यप्राणी आहेत. अधूनमधून वाघ ही आपली हजेरी लावतो. मागील महिन्यात हिवरा पथराई गावाशेजारी वाघाने गायीची शिकार केली होती. वाघ दर्शनाने गावकरी भयभीत झाले आहेत.

उन्हाच्या तीव्रतेमुळे अनेक तलाव आटू लागले आहेत. वन्यप्राण्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत  आहे. उन्हाळ्यात जंगलात वणवाही लागून प्राणी जिवाच्या भीतीने गावांचा आश्रय घेऊ लागले आहेत. आता वन्यप्राणी गावाकडे वळल्याची बातमी कळताच शिकारी सावध झाले  आहेत. वनविभागाने वन्यप्राण्यांसाठी पाण्याची व्यवस्था करावी. अशी मागणी वन्यप्राणीप्रेमींनी केली आहे.

Web Title: wild animal wandering for water