बावनकुळे यांना मोठी जबाबदारी देणार - देवेंद्र फडणवीस 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019

टेकाडी, (जि. नागपूर) : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी योग्य नियोजन करून विकासाला गती दिली, तेव्हा विरोधकांनी बावनकुळे यांच्या तिकिट वाटपावर मगरीचे आसू काढू नये, कारण बावनकुळे जे आहेत, त्याहीपेक्षा मोठे पद त्यांना त्यांच्या कर्तृत्वाने मिळणारच आहे, अशी घोषणा कन्हान येथे झालेल्या प्रचारसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. 

टेकाडी, (जि. नागपूर) : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी योग्य नियोजन करून विकासाला गती दिली, तेव्हा विरोधकांनी बावनकुळे यांच्या तिकिट वाटपावर मगरीचे आसू काढू नये, कारण बावनकुळे जे आहेत, त्याहीपेक्षा मोठे पद त्यांना त्यांच्या कर्तृत्वाने मिळणारच आहे, अशी घोषणा कन्हान येथे झालेल्या प्रचारसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. 
रामटेकमधून भाजपचे उमेदवार डी. मल्लीकार्जून रेड्डी यांच्या प्रचारासाठी त्यांनी कन्हान येथे सभा घेतली. मुख्यमंत्र्यांनी कॉंग्रेसच्या पंधरा वर्षांच्या कामकाजावर टीका केली. ते म्हणाले, आघाडीच्या पंधरा वर्षांचा हिशेब तुम्ही घेऊन या, माझ्या पाच वर्षांचा हिशेब मी घेऊन येतो. तुमच्यापेक्षा दुप्पट काम झाल नसेल तर मत मागायला लोकांकडे जाणार नाही. 
शिवसेनेचे बंडखोर उमेदवार आशिष जयस्वाल यांचे नावही न घेता कांग्रेस दिलेले मत म्हणजेच बंडखोरांला मत आणि बंडखोर कधी निवडून येत नसल्याचा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. बंडखोर आणि कांग्रेसच्या चुकीच्या माणसांच्या हाती रामटेकची सूत्रे देऊ नका. देशासाठी आणि भारत मातेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाती सत्ता असण्याची गरज आहे असेही ते म्हणाले, सर्जिकल स्ट्राईक आणि कलम 370 चा उल्लेख करणेही ते विसरले नाहीत. 

शिवसेना नेत्यांची अनुपस्थितीची चर्चा 
कन्हान येथील केमिकल कंपनी मैदानात झालेल्या सभेत व्यासपीठावर भाजपसह युतीमधील इतर पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. मात्र, शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष शरद डोनेकर यांच्या व्यतिरिक्त खासदार कृपाल तुमाणे हे उपस्थित नसल्याने चांगलीच चर्चा रंगली होती. रामटेकमध्ये भाजप-शिवसेना आमनेसामने असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. 

रस्त्यावर पन्नास वर्षे खड्डे पडणार नाहीत 
जलालखेडा : काटोलचे भाजप उमेदवार चरणसिंग ठाकूर यांच्या प्रचारासाठी जलालखेडा येथे आयोजित सभेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांची स्तुती केली. ते म्हणाले, गडकरी यांनी केलेले सिमेंट रस्त्यांवर पन्नास वर्षे खड्डे पडणार नाहीत. राज्यातील 50 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिल्याचे सांगून 50 हजार कोटीची मदत शेतकऱ्यांना केल्याचे सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: will give big responsibility to Bawankule