निवडणुकीचे गुपित आताच सांगणार नाही : आदित्य ठाकरे

निवडणुकीचे गुपित आताच सांगणार नाही : आदित्य ठाकरे
नागपूर : आपण विधानसभेची निवडणूक लढणार असल्याची खमंग चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये जोरात सुरू आहे. मतदारसंघाविषयी तर्कवितर्क लढविल्या जात आहेत. मात्र ती केव्हा लढायची, कुठून लढायची याचे गुपित मी आताच तुम्हाला सांगणार नाही, अशी कोटी करून युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी याविषयीचे गूढ आणखी वाढविले.
युवा सेनेच्या जनआशीर्वाद यात्रेसाठी ते नागपूरला आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. सध्या जागावाटपाच्या मुद्द्यावर सुरू असलेल्या चर्चेबाबत आदित्य म्हणाले, की शिवसेना-भाजपची युती केवळ सत्तास्थापनेसाठी नाही. आमचा वैचारिक अजेंडा एक आहे. जागावाटपाचा निर्णय उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार आहेत. ते दोघेजण संयुक्त पत्रकार परिषद घेऊन जागावाटप जाहीर करणार आहेत. सध्या 50-50 फॉर्म्युला कायम असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.
सध्या आम्ही जनतेचा आशीर्वाद आणि त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी निघालो आहोत. त्यामुळे आत्ताच निवडणुकीचा व जबाबदारीचा पेपर फोडणार नाही. राज्यातील बेरोजगारी दूर करायची आहे. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यायची आहे. कृपा करून कर्जमाफी हा शब्द वापरू नका. माफी आरोपीला दिली जाते, याचा आवर्जून उल्लेखही त्यांनी केला. पत्रकार परिषदेला एकनाथ शिंदे, राज्यमंत्री संजय राठोड, रामटेकचे खासदार कृपाल तुमाने, माजी आमदार आशीष जयस्वाल उपस्थित होते.

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com