महावितरण देणार कारवाईचा शॉक; जाणून घ्या कसा?

mahavitaran khamb
mahavitaran khamb

अकोला : महावितरणच्या अकोला परिमंडळातील 27 हजार 65 औद्योगिक आणि वाणिज्यिक ग्राहकांकडे वीज बिलाची 32 कोटी 11 लाख रुपयापेक्षा जास्त थकबाकी आहे. या ग्राहकांविरुद्ध कारवाईसाठी शनिवार (ता.29) पर्यंत मोहीम राबविली जाणार असून, त्यासाठी महावितरणने विशेष पथक गठीत केले आहे.

वीज खंडितची होणार कारवाई
अकोला परिमंडळ अंतर्गत असलेल्या महावितरणच्या अकोला, बुलडाणा आणि वाशीम जिल्ह्यात मोठ्या ग्राहकांची वीज देयकेही मोठ्याप्रमाणावर थकीत आहे. त्यात अकोला जिल्ह्यातील नऊ हजार 488 वाणिज्यिक ग्राहकांकडे सर्वाधिक दहा कोटी 88 लाख सहा हजारांचे देयक थकित आहे. बुलडाणा जिल्ह्यातील नऊ हजार 123 ग्राहकांकडे सात कोटी दहा लाख 63 हजार, तर वाशीम जिल्ह्यातील चार हजार 96 ग्राहकांकडे सात कोटी 17 लाख 35 हजार रूपये वीज बिलाचे थकित आहे. औद्योगिक ग्राहकांमध्ये अकोला जिल्ह्यातील एक हजार 589 ग्राहकांकडे दोन कोटी 80 लाख रुपयांची थकबाकी आहे. बुलडाणा जिल्ह्यातील एक हजार 966 ग्राहकांकडे दोन कोटी 66 लाख 16 हजार, तर वाशीम जिल्ह्यातील 804 ग्राहकांकडे एक कोटी 49 लाख रुपयांची वीज देयके थकित आहे. त्यामुळे महावितरणने वीज पुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

तिन्ही जिल्ह्यात कारवाई
थकबाकीदार ग्राहकांनी त्यांच्या वीज देयकांचा भरणा केला नाही तर अकोला, वाशीम आणि बुलडाणा या तिन्ही जिल्ह्यात महावितरणतर्फे वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम राबविण्याचे निर्देश अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता अनिल डोये यांनी तिन्ही जिल्ह्यातील अधीक्षक अभियंत्यांना दिले आहे.

...तर कर्मचाऱ्यांवरच कारवाई!
सर्व विभागीय कार्यकारी अभियंता यांच्या नेतृत्वात आखण्यात आलेल्या मोहिमेत थकबाकी वसूल करण्यासाठी किंवा त्या ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यासाठी महावितरण मुख्य कार्यालयाने 29 फेब्रुवारीचे उद्दिष्ठ ठरवून दिले आहे. त्यामुळे नियमित वीज बिलांचा भरणा करणाऱ्या ग्राहकांना अडथळा ठरणाऱ्या थकबाकीदार ग्राहकांवर कारवाई न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा मुख्य अभियंता अनिल डोये यांनी दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com