सनदी अधिकारी होऊन कटुंबाचा सामाजिक वारसा चालविणार

सनदी अधिकारी होऊन कुटुंबाकडून मिळालेला सामाजिक सेवेचा वारसा चालविणार, असे मत संघ लोकसेवा आयोगाची परीक्षा क्रॅक केलेले बंकेश पवार यांनी व्यक्त केले
सनदी अधिकारी होऊन कटुंबाचा सामाजिक वारसा चालविणार
सनदी अधिकारी होऊन कटुंबाचा सामाजिक वारसा चालविणार

दिग्रस (जि. यवतमाळ) : सर्वसामान्यांच्या जीवनात बदल घडवता यावा, यासाठी सनदी अधिकारी बनण्याचे स्वप्न बघितले होते. आज ते पूर्ण झाल्याचा आनंद आहे. सनदी अधिकारी होऊन कुटुंबाकडून मिळालेला सामाजिक सेवेचा वारसा चालविणार, असे मत संघ लोकसेवा आयोगाची परीक्षा क्रॅक केलेले बंकेश पवार यांनी व्यक्त केले. ते दैनिक ’सकाळ’सोबत बोलत होते.

दिग्रस तालुक्यातील झिरपूरवाडी हे बंकेश पवार यांचे मूळ गाव आहे. ते यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामजी आडे यांचे नातू आहेत. त्यांची आई रामजी आडे यांची मुलगी आहे. रामजी आडे यांची राजकीय व सामाजिक कारकीर्द आजही लोकांच्या स्मरणात आहे. तर, बंकेशचे वडील बाबाराव पवार हे वन विभागातून वनपरिक्षेत्र अधिकारी या पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत.

बंकेशचे पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण यवतमाळ येथील सेंट अलायसीस स्कूलमध्ये झाले. बारावी वाधवानी कनिष्ठ महाविद्यालयातून केले. पुणे येथील विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून बी. टेक केले. त्यानंतर नामांकीत तीन कंपन्याकडून चांगल्या पगाराच्या नोकर्‍या मिळाल्या. परंतु सामाजिक सेवेसाठी करिअर म्हणून आयएएस करण्याचा निर्धार केला. त्यासाठी संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केली. दिल्ली येथील इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातून समाजशास्त्र या विषयात एम. ए. केले आहे.

सनदी अधिकारी होऊन कटुंबाचा सामाजिक वारसा चालविणार
'कितीही आपटा पुणे मनपावर भगवा फडकणार'; राऊतांची टोलेबाजी

पुण्यात असण्याचा खूप फायदा झाला. आई-वडीलांपासून प्रेरणा मिळाली. ते माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. आई गृहिणी असली तरी तिच्या संस्कारांनी घडविले. आधी बेसिक पक्के केले. परीक्षा कशी असते ते समजून घेतली. त्यात विचारण्यात येणार्‍या प्रश्नांची उजळणी केली. नियमितता व संयम या दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. मला यूपीएससी परीक्षा देण्यासाठी माझे मित्र आकाश आगळे, ज्याने गेल्या वर्षी युपीएससी परीक्षा क्रॅक केली, त्याचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

आईचे संस्कार व वडिलांचे समर्पित भावनेने केलेले कार्य मला बळ देतात. ग्रामीण भागाची प्रगती झाली तर देशाची प्रगती झाली असे समजले जाते. युवकांना गावातच रोजगार देता येईल का, यासाठी प्रयत्न करणार असून शेतकर्‍यांच्या समस्या सोडविण्यासाठी विशेष प्राधान्य असेल. मला मिळालेल्या रँकनुसार भारतीय पोलीस सेवेत संधी मिळेल असे वाटते. पुन्हा आयएएस ही रँक मिळविण्यासाठी एकदा प्रयत्न करणार आहे.

- बंकेश पवार, यूपीएससी, 516 वी रँक

सनदी अधिकारी होऊन कटुंबाचा सामाजिक वारसा चालविणार
विद्यार्थ्यांच्या हितासाठीच आरोग्य भरतीची परीक्षा पुढे ढकलली - राजेश टोपे

डॉ. कांबळे, भागवत, डॉ. राठोड यांचे मार्गदर्शन लाभले

यवतमाळचे माजी जिल्हाधिकारी डॉ. हर्षदीप कांबळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. मुलाखतीसाठी हैदराबाद येथील पोलिस आयुक्त महेश भागवत यांनी खूप मदत केली. त्यांनी महाराष्ट्रातील मुलांचा ग्रुप बनवून त्यांच्यासाठी सेशन्स घेतले. तसेच वाशीम येथील सहायक विक्री कर आयुक्त डॉ. प्रतीक राठोड यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यामुळे तयारी सोपी झाली.

-ऋषीकेश हिरास

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com