आदिवासी समाजाचा कायापालट करणार : डॉ. अशोक उईके

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019

पुसद (जि. यवतमाळ) : आदिवासी विकासाच्या योजना निष्क्रिय नेत्यांनी समाजापर्यंत पोहोचू दिल्या नाहीत. त्यामुळे आदिवासी समाज आजही मागासलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रथमच झालेल्या माझ्यासारख्या आदिवासी आमदाराला मंत्रिपदाची संधी दिली. या संधीचे सोने करीत आदिवासी योजना तळागाळात पोहोचवून आदिवासी समाजाचा कायापालट करणार, असा निर्धार आदिवासी विकास मंत्री प्राचार्य डॉ. अशोक उईके यांनी व्यक्त केला.

भारतीय जनता पक्षाच्या पुसद येथील शक्ती केंद्रप्रमुख, बूथ प्रमुख व पेज प्रमुख यांच्या गुरुवारी (ता.5) आयोजित मेळाव्यात तेबोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार विजय पाटील चोंढीकर होते. डॉ. उईके म्हणाले की, समाजकल्याण विभाग आणि आदिवासी विभाग वेगळा झाल्यानंतर आदिवासी विभाग जाणीवपूर्वक मागासलेला ठेवण्यात आला. अनेक योजना आदिवासींपर्यंत पोहोचू दिल्या नाही. लाभार्थी आदिवासी मात्र, लाभ गैरआदिवासीला असे प्रकार आदिवासी विभागात घडल्याने मूळ आदिवासींना शासकीय योजनांचा लाभ मिळू शकला नाही. त्यांची दिशाभूल करण्यात आली. माझ्या कार्यकाळात आदिवासींना लाभ मिळण्यासाठी झटत असल्याचे त्यांनी सांगितले. या मेळाव्यात पुसद तालुक्‍यातील अनेक कार्यकर्त्यांनी भाजपत प्रवेश घेतला, त्या सर्वांचे स्वागत करून भाजपत या कार्यकर्त्यांचा सन्मान होईल, असे त्यांनी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Will transform the tribal community: Ashok Uike