नागपुरच्या मालविका बनसोडला विजेतेपद

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 जुलै 2018

येथील विभागीय क्रीडा संकुलात झालेल्या सातव्या आशियाई बॅडमिंटन स्पर्धेत मुलींच्या एकेरीत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नागपुरच्या मालविका बनसोडने विजेतेपद पटकाविले. 

नागपूर : येथील विभागीय क्रीडा संकुलात झालेल्या सातव्या आशियाई बॅडमिंटन स्पर्धेत मुलींच्या एकेरीत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नागपुरच्या मालविका बनसोडने विजेतेपद पटकाविले. 

अंतिम सामन्यात तिसऱ्या मानांकित मालविकाने थायलंडच्या सोम सावंगसरीचा २१-१३, २१-१२ असा सरळ दोन गेममध्ये पराभव केला. किरण माकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करणाऱ्या मालविकाचे हे आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील पहिलेच विजेतेपद आहे. शिवाजी सायन्सची विद्यार्थीनी असलेल्या मालविकाने यापूर्वी विश्व, आशियाई ज्युनिअर स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले. 

Web Title: Winner of Malvika Bansodal from Nagpur