esakal | ग्वाही! चौफेर विकास, आता रोजगारावर भर
sakal

बोलून बातमी शोधा

नितीन गडकरी

ग्वाही! चौफेर विकास, आता रोजगारावर भर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : रोजगारासाठी नवनवे दालन सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्रालयातर्फे उपलब्ध करून देण्यात येत आहे. शहराचा चौफेर विकास झाला असून आता शहर बेरोजगारमुक्त करण्यास गती देण्यात येणार असल्याचे केंद्रीय सूक्ष्म, लघु, मध्य उद्योग व रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी नमूद केले. 50 हजार लोकांना रोजगाराचे आश्‍वासन दिले होते. त्यापैकी 28 हजार तरुणांना रोजगार दिल्याची पुस्तीही त्यांनी दिली.
केंद्रीय सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्रालयाच्या एमएसएमई विकास संस्था नागपूर व स्वयंम फाउंडेशनतर्फे जुना भंडारा मार्गावरील परंपरा सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमात गडकरी यांच्या हस्ते स्वयंरोजगार प्रेरणा अभियानाला प्रारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते.  प्रत्येकाकडे रोजगाराच्या चांगल्या योजना असते. या योजनांना मूर्त रूप देण्यासाठी एमएसएमई मार्गदर्शन करत असल्याचे गडकरी यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, रोजगार वाढविण्यासाठी सरकार सदैव पाठीशी आहे. महिलांनी उद्योजक म्हणून पुढे येण्यासाठी रेडिमेड गारमेंट निर्मिती आदीकडे वळावे. उद्योगासाठी कुठल्या योजना आहे, त्यासाठी कर्ज कसे घ्यावे, याबाबत या अभियानातून मार्गदर्शन मिळेल. महापालिका उद्योजिका भवन तयार करीत असून महिलांनी तयार केलेल्या उत्पादनाचे येथे मार्केटिंग होईल. उद्योग व्यवसाय पुढे जावा, गरिबी दूर करण्याचा प्रयत्न या मंत्रालयामार्फत होत आहे. देशात रोजगारनिर्मितीसाठी 80 हजार कोटींचे कर्ज तीन विदेशी वित्त संस्थांनी मंजूर केले आहे. ग्रामीण व कृषी क्षेत्रात रोजगार वाढविण्यासाठी याचा वापर केला जाणार आहे. सध्या ग्रामीण व कृषी क्षेत्रात 75 हजार कोटींचा टर्नओव्हर होत आहे. तो 150 हजार कोटींपर्यंत नेण्याचे लक्ष्य आहे. चीनमधून अगरबत्ती आयात केली जात होती. त्याचा परिणाम येथील अगरबत्ती बाजारावर पडला. त्यामुळे आयात शुल्क वाढविण्याची सूचना केली. त्यामुळे आता 30 टक्के आयात शुल्क वाढविण्याचा निर्णय केंद्र सरकारने कालच घेतल्याचेही ते म्हणाले. शहरातील टी-स्टॉलधारकांनी कुल्हडमध्ये चहा देणे सुरू करावे, यातून कुंभार समाजाला मोठा रोजगार मिळेल, असेही आवाहन त्यांनी केले. या अभियानात कॅनरा बॅंक, ग्रीनक्रूड ऍन्ड बायोफ्यूएल फाउंडेशनसह अनेक स्टॉल लावण्यात आले होते. यावेळी बेरोजगारांच्या नोंदणीसाठी तयार करण्यात आलेल्या संकेतस्थळाचे लोकार्पण गडकरी यांनी केले. सोशल मीडिया विश्‍लेषक व ग्रीनक्रूड ऍण्ड बायोफ्यूएल फाउंडेशनचे सचिव अजित पारसे यांनी हे संकेतस्थळ तयार केले आहे.

loading image
go to top