दोन मुलाना घेऊन महिलेची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

यवतमाळ : मारेगाव तालुक्यातील सगणापूर येथील महिलेने दोन मुलासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. यात विवाहित महिलेसह सहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला तर तीन वर्षीय मुलगी सुदैवाने बचावली आहे. मंगळवारी ता. ११ दुपारी ४ वाजतादरम्यान ही घटना घडली. या घटनेने परिसर हादरून गेला आहे.

मारेगाव पासून 11 किमी अंतरावर असलेल्या सगणापूर येथे रूपा विनोद जुनगरी (31) ही महिला राहते. रुपाने दुपारी चारच्या दरम्यान मुलगा लक्ष वय ६ वर्ष व मुलगी आरोही वय ३ वर्ष यांच्यासह स्वत:च्या शेतातील विहिरीत उडी घेतली. यावेळी बाजुच्या शेतात काम करत असलेले अजाबराव आत्राम यांना ही बाब लक्षात आली. त्यांनी तातडीने विहिरीकडे धाव घेतली.त्यांनी आजुबाजुच्या लोकांना गोळा करून या सर्वांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र यात फक्त त्यांना मुलीचा जीव वाचवता आला. तर आई व मुलाचा बाहेर काढत पर्यंत मृत्यू झाला होता.
या घटनेची फिर्याद मृत महिलेचे भासरे मंगेश जुनगरी यांनी मारेगाव पोलीस स्टेशनला दिली. आत्महत्या करण्याचे कारण स्पष्ट झाले नाही. या घटनेने सगणापुर गावावर शोककळा पसरली आहे. प्रकरणाचा मारेगाव पोलीस तपास करीत आहे

Web Title: The woman committed suicide by taking two children