बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार; एक जखमी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

वरोरा (जि. चंद्रपूर) : तालुक्‍यातील वायगाव शिवारात शुक्रवारी (ता. 14) बिबट्याच्या हल्ल्यात एक व्यक्ती जखमी झाला. ही घटना ताजी असतानाच अवघ्या काही तासांच्या आत कापूस वेचणी करणाऱ्या महिलेला बिबट्याने ठार केले. या परिसरात मागील एका महिन्यापासून बिबट्याची प्रचंड दहशत आहे. सात किमीच्या परिसरात आजवर बिबट्याने पाच बळी घेतले. दोघांना जखमी केले.

वायगाव येथे शेतात पिकांची राखण करताना विजय झाडे यांच्यावर बिबट्याने हल्ला केला. यात ते जखमी झाले. तेथून बिबट्याने पळ काढला. याच शेतशिवाराच्या परिसरात कापूस वेचणी करणाऱ्या निर्मला बबन श्रीरामे (वय 38) हिच्यावर हल्ला चढविला. यात ती जागीच ठार झाली. अर्जुनी चारगाव, वायगाव, राळेगाव, रामदेगी ही गावे सात किमीच्या परिसरात येतात. याच गावांच्या शेतशिवारात आतापर्यंत बिबट्याने पाच बळी घेतले. वनविभागाने परिसरातील शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावले.

Web Title: Woman killed in Leopard attack; One injured

टॅग्स