esakal | भेंडवीत अंगावर वीज पडून महिला ठार, गोजोलीत बैल ठार
sakal

बोलून बातमी शोधा

lightning_.jpg

गडचांदुर येथील सुनंदा बावणे ही महिला राजुरा तालुक्‍यातील भेंडवी येथील सलाम यांच्या शेतात कापूस बियाणे टिपायला गेली होती. तिच्यासोबत गडचांदुरातील नऊ महिला मजूर आणि भेंडवी येथील सात महिला शेतात काम करीत होत्या.

भेंडवीत अंगावर वीज पडून महिला ठार, गोजोलीत बैल ठार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोरपना : शेतात काम करीत असतानाच वीज पडून महिला ठार झाली. ही घटना राजुरा तालुक्‍यातील भेंडवी येथे सोमवारी (ता. 15) सकाळच्या सुमारास घडली. मृत महिलेचे नाव सुनंदा सुधाकर बावणे असे आहे. गोंडपिपरी तालुक्‍यातील गोजोली येथे वीज पडून बैल ठार झाला. जिल्ह्यात सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू आहे.
गडचांदुर येथील सुनंदा बावणे ही महिला राजुरा तालुक्‍यातील भेंडवी येथील सलाम यांच्या शेतात कापूस बियाणे टिपायला गेली होती. तिच्यासोबत गडचांदुरातील नऊ महिला मजूर आणि भेंडवी येथील सात महिला शेतात काम करीत होत्या. दरम्यान, जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे शेतात असलेल्या गोठ्याकडे महिलांनी धाव घेतली.

याचदरम्यान सुनंदा बावणे यांच्या अंगावर वीज कोसळली. तिचा जागीच मृत्यू झाला. दोन वर्षांपूर्वीच सुनंदाच्या पतीचा मृत्यू झाला होता. दोन्ही मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारी सुनंदावर होती. तिच्या जाण्याने मुले पोरकी झाली आहेत.
हेही वाचा : लग्न कर्तव्य आहे का? चांगली वधू आहे, असा फोन आल्यास सावधान!
 

गोंडपिपरी तालुक्‍यात खरीप पिकांच्या पेरणीला सुरवात झाली आहे. सोमवारी सकाळी शेतीच्या हंगामासाठी गोजोली येथील शेतकरी संजय मोहुर्ले बैलाची जोडी घेऊन शेतात काम करीत होता. यादरम्यान पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे मोहुर्ले यांनी नांगरणी बंद करीत बैलांना सोडून दिले. पावसाने जोर पकडल्याने बैल घराच्या दिशेने निघाले. याचदरम्यान एका बैलाच्या अंगावर वीज कोसळली. त्यात बैल मृत्यमुखी पडला. शेती हंगामाला सुरुवात झालेली असतानाच बैल दगावल्याने शेतकऱ्यावर संकट कोसळले आहे.