सर्पदंशाने महिलेचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

गोंदिया : विषारी सापाने चावा घेतल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (ता. 13) सकाळी साडेसातच्या सुमारास म्हसवाणी येथे घडली. सागन योगराज अंबुले (वय 59), असे मृत महिलेचे नाव आहे.

गोंदिया : विषारी सापाने चावा घेतल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (ता. 13) सकाळी साडेसातच्या सुमारास म्हसवाणी येथे घडली. सागन योगराज अंबुले (वय 59), असे मृत महिलेचे नाव आहे.
सागन या घरी झाडू लावत होत्या. या वेळी, समोरील छपराच्या कोपऱ्यातून साप निघाला. सापाने सागन यांच्या पायाला चावा घेतला. ती जोरात ओरडल्याने त्यांचा मुलगा उपयज अंबुले हा धावत आला. त्याने छपुराच्या कोपऱ्यातील छिद्रात सापाला जाताना पाहिले. या वेळी सागन हिने साप चावलेल्या पायाला जळजळ होत असल्याचे सांगितले. तिला औषधोपचाराकरिता रुग्णालयात नेत असताना तिचा वाटेतच मृत्यू झाला. प्रकरणी डुग्गीपार पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Woman killed by snakebite

टॅग्स