पहाटेच महिला गेली जंगलात अन्‌ घडली ही घटना...वाचा पुढे

file photo
file photo

चिमूर (जि. चंद्रपूर) : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमध्ये तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी गेलेल्या महिलेला वाघिणीने हल्ला करून ठार केले. लीलाबाई चंद्रभान जीवतोडे (वय 65) असे मृत महिलेचे नाव आहे.

ही घटना मंगळवारी (ता. 19) सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घडली. त्यामुळे तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात जाणाऱ्या नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.

पहाटेच जंगलात जातात मजूर

तालुक्‍यातील बहुतेक तेंदूपत्ता संकलन केंद्रावर लॉकडाउनच्या नियमाचे पालन सुरू आहे. पळसगाव वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या कोलारा (तु) येथील तेंदूपत्ता मजूर नजीकच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोनमध्ये तेंदूपत्ता संकलन करण्याकरिता जातात. नेहमीप्रमाणे गावातील मजूर, पतीसोबत लीलाबाई जीवतोडे या तेंदू संकलनासाठी पहाटेच जंगलात गेल्या होत्या.

मदतीसाठी धावले मजूर

सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास वाघिणीने तेंदूपत्ता तोडण्यात मग्न असलेल्या लीलाबाईवर हल्ला केला. लीलाबाईच्या झटापटीने व आवाजाने पती चंद्रभानला वाघिणीने हल्ला केल्याचे दिसले. त्यामुळे चंद्रभानने आरडाओरड सुरू केली. यादरम्यान तिच्या मदतीसाठी गावातील तेंदूपत्ता मजूर धावून आले. त्यानंतर त्यांनी वाघिणीला पळवून लावले. मात्र लीलाबाईला वाचवू शकले नाहीत.


एका महिन्यापूर्वी महिलेला ठार केले

एका महिन्यापूर्वी याच परिसरात सातारा येथील मोहफूल वेचणारी यमुना गायकवाड या महिलेस वाघिणीने ठार मारले होते. वाघिणीच्या या परिसरातील संचाराने सर्वत्र दहशत पसरली आहे. त्यामुळे तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या मजुरावर लॉकडाउनच्या काळातही जीवनमरणाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com