esakal | दैव बलवत्तर म्हणून... उपचारासाठी एकटीला नागपूरला हलवले, तेव्हापासून बेपत्ता; दीड महिन्यांनी आली ही बातमी 
sakal

बोलून बातमी शोधा

Woman was shifted to Nagpur for treatment on corona, she found after  one month

धर्मापुरी येथे कोरोना रुग्ण आढळल्याने अनेक कुटुंबांना विलगीकरण केंद्रात दाखल केले. तेथे वैशाली डोळे हिला फिटचा आजार असल्याचे लक्षात आल्याने उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले. तेव्हापासून दीड महिन्यांपर्यंत तिच्याबाबत कोणतीही माहिती मिळत नसल्याने भाऊ व मुलाला चिंता लागली होती.

दैव बलवत्तर म्हणून... उपचारासाठी एकटीला नागपूरला हलवले, तेव्हापासून बेपत्ता; दीड महिन्यांनी आली ही बातमी 

sakal_logo
By
मेदन लांडगे

कुंभली (जि. भंडारा) : कोरोनामुळे सर्वांचेच जीवनचक्र बदलून गेले आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आता उपचारांचीही बोंब आहे. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील चित्र अधिक विदारक आहे. गंभीर रुग्णांना परस्पर नागपूरला हलवले जाते. रुग्णाच्या सोबत कुणीही नसल्याने त्याची प्रचंड गैरसोय होते. प्रकार भंडारा जिल्ह्यात उघडकीस आला. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.  

जवळच्या धर्मापुरी येथे कोरोना रुग्ण आढळल्याने अनेक कुटुंबांना विलगीकरण केंद्रात दाखल केले. तेथे वैशाली डोळे हिला फिटचा आजार असल्याचे लक्षात आल्याने उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले. तेव्हापासून दीड महिन्यांपर्यंत तिच्याबाबत कोणतीही माहिती मिळत नसल्याने भाऊ व मुलाला चिंता लागली होती. नंतर तिच्या शोधात गेलेल्या गावकऱ्यांनी चार रुग्णालय धुंडाळून तिला शोधून परत आणले. मात्र, दीड महिन्यांपासून चार दवाखान्यांत झालेल्या उपचारांमुळे वैशालीची मनोदशा बिघडली असून, ती काहीही सांगण्याच्या स्थितीत नाही.
 

अधिक वाचा - राजकारण : शिवसेनेत काँग्रेसी कल्चरचा शिरकाव; निष्ठावंतांमध्ये अस्वस्थता, वाचा...
 

धर्मापुरी येथे एक कोरोना रुग्ण आढळून आला. त्यानंतर गावांत आरोग्य विभागाकडून सर्व्हेक्षण करण्यात आले होते. त्यात गावात बरेच व्यक्ती रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे त्यांना साकोली येथील विलगीकरण केंद्रात दाखल केले. त्यापैकी फिटचा आजार असलेल्या वैशाली बाळू डोळे हिला उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले होते. तिच्यासोबत घरचे कुणाही नव्हते. त्यानंतर दीड महिन्यांपासून तिची माहिती मिळत नसल्याने तिचा भाऊ चिंताग्रस्त होता. वैशालीचा चार वर्षीय मुलगा सतत रडत असल्याने भाऊ बेजार झाला होता.

त्यामुळे भाऊ विजय कोहळे याने बहिणीबाबत माहिती मिळण्यासाठी पोलिस पाटील यांच्या मदतीने तालुका वैद्यकीय अधिकारी, तहसीलदार, पोलिस ठाणे, जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन सादर करून बहिणीचा शोध घेण्यास मदतीची विनंती केली होती. मात्र, प्रशासकीय पातळीवरून काहीही झाले नाही. त्यामुळे शेवटी 17 ऑगस्टला "सकाळ'मध्ये "दीड महिन्यापासून बहिणीची चिंता' या आशयाची बातमी प्रकाशित झाली. त्यानंतर आरोग्य विभागाकडून वैशाली नागपूर येथील मेडिकल कॉलेजमध्ये उपचार घेत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर तिला आणण्यासाठी विजय कोहळे, तंटामुक्त समिती अध्यक्ष हरिभाऊ खोटेले, पोलिस पाटील योगराज वाघमारे आणि साकोली येथील पोलिस कर्मचारी वाढवे यांची चमू नागपूरला रवाना झाली.

चार रुग्णालयांत शोधकार्य


नागपूरला पोहोचल्यावर चौकशी केली असता वैशाली मेडिकल कॉलेजमध्ये नव्हती. तिला काही दिवसांनी शालिनीताई मेघे रुग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती मिळाली. त्यामुळे ही चमू मेघे रुग्णालयात गेली. तेथे चौकशी केली असता तिला कोविड केअर सेंटरमध्ये पाठविल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे कोविड केअर सेंटरमध्ये जाऊन विचारपूस केली. तेव्हा वैशालीला तेथे फिट आली होती. त्यामुळे उपचारासाठी मेयो रुग्णालयात पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले. शेवटी मेयो रुग्णालयात त्यांना वैशालीचा शोध लागला. तिला विचारपूस केली असता वैशाली काहीही सांगण्याच्या स्थितीत नसल्याने कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देत नाही. मंगळवारी रात्री ही चमू वैशाली डोळे हिच्यासोबत गावी धर्मापुरी येथे परत आली. तिची प्रकृती बरोबर नाही. पण, तिच्या चार वर्षीय मुलाला आई मिळाल्याचे सगळे काही मिळाल्याचे समाधान झाले आहे. दीड महिन्यानंतर बहीण सुखरूप असल्याने विजय कोहळे याने सुटकेचा नि:श्‍वास सोडला. 

संपादन : अतुल मांगे 

loading image
go to top