‘सुलभ’मध्ये महिलेवर अत्याचाराचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जुलै 2019

अजनी ठाण्यांतर्गत सुलभ शौचालयात एका आरोपीने महिलेवर बळजबरी करून लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. रामेश्वरी मार्गावरील सुलभ शौचालयात पीडित महिला साफसफाई आणि कलेक्‍शनचे काम करते. मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास ती गल्ल्यावर एकटीच बसली होती. दरम्यान, ३० ते ३५ वर्षे वयोगटातील आरोपी तेथे आला. त्याने महिला एकटी असल्याचे पाहून जबरीने तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.

नागपूर - अजनी ठाण्यांतर्गत सुलभ शौचालयात एका आरोपीने महिलेवर बळजबरी करून लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. रामेश्वरी मार्गावरील सुलभ शौचालयात पीडित महिला साफसफाई आणि कलेक्‍शनचे काम करते. मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास ती गल्ल्यावर एकटीच बसली होती. दरम्यान, ३० ते ३५ वर्षे वयोगटातील आरोपी तेथे आला. त्याने महिला एकटी असल्याचे पाहून जबरीने तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. 

पीडितेने विरोध करीत त्याच्या हाताचा चावा घेत आपली सुटका करून घेतली आणि मदतीसाठी बाहेर पळाली. दरम्यान, आरोपीने गल्ल्यातील रोख ५ हजार रुपये आणि मोबाईल असा १० हजार रुपयांचा माल चोरून नेला. पीडितेने घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी विनयभंग आणि चोरीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Women Atrocity in Toilet Crime