कूलरच्या धक्‍क्‍याने विवाहितेचा मृत्यू

file photo
file photo

धामणगाव रेल्वे (अमरावती) : येथील जुना दतापूर भागातील एका आईचा कूलरच्या विद्युत धक्‍क्‍याने विवाहितेचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर तर तिची 8 महिन्यांची चिमुकली पलंगावर असल्यामुळे तिचा जीव वाचला. ही घटना रविवारला (ता. 23) दुपारी साडेचारच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार असे की, येथील जुना दत्तापूर विभागात राहणारी विवाहिता आपल्या आई-वडिलांसोबत राहते. दरम्यान, हिचे आईवडील हे ग्रामपंचायतचे मतदान करण्यासाठी रविवारला (ता. 23) बाहेरगावी गेले
होते. मृत विवाहितेला घरातील कूलरचा विद्युत धक्‍का लागला. येथील ग्रामीण रुग्णालयात तिला उपचारासाठी दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. दरम्यान, अवघ्या आठ महिन्यांची मुलगी पलंगावर असल्याने तिचा जीव वाचला. या घटनेची माहिती दत्तापूर पोलिस ठाण्यात हनुमंत बाळकृष्ण निखार यांनी दिली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस कर्मचारी विजयसिंह बघेल, सागर कदम, हेमंत दहाट करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com