बाथरूममध्ये प्रसूती

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 मे 2018

नागपूर - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील स्त्रीरोग प्रसूतीशास्त्र विभागाच्या बाथरूममध्येच एका महिलेचे बाळंतपण झाल्याच्या चर्चेने मेडिकलमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. सायंकाळी पाचच्या सुमारास हा प्रकार घडल्याचे समजते. मात्र, असा कोणताही प्रकार घडला नसल्याचा दावा प्रशासनाचा आहे. 

आशिया खंडातील सर्वाधिक मोठे नागपूरचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहे. प्रचंड विस्तार आणि रुग्णांच्या गर्दीने येथे केव्हा काय घडेल, याचा नेम नसतो. मेडिकलमध्ये स्त्रीरोग प्रसूतीशास्त्र विभागाचे पाच वॉर्ड सध्या कार्यरत आहेत. त्यापैकी एका वॉर्डात एक गरोदर महिला बाळंतपणासाठी भरती होती. ती सायंकाळी पाचच्या सुमारास बाथरूममध्ये गेली असता तिला प्रसूती कळा आल्या. वॉर्डातील परिचारिकांनी काही हालचाल करायच्या आत तिला प्रसूतीकळा असह्य झाल्याने तिने बाथरूममध्येच एका बाळाला जन्म दिल्याचे सूत्रांनी सांगितले. याबाबत प्रशासनाशी संपर्क साधला असता असा कोणताही प्रकार घडला नसल्याचा दावा करण्यात आला. मेडिकलमध्ये सायंकाळच्या सुमारास ही वार्ता वाऱ्यासारखी पसरल्याने तडकाफडकी वैद्यकीय अधीक्षक कार्यालयातून दोन डॉक्‍टरांना वॉर्डात पाठविण्यात आले होते. मात्र, असा कोणताही प्रकार तिथे निदर्शनास आला नसल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश गोसावी यांनी सांगितले.

Web Title: women delivery in bathroom