आंदोलनात सहभागी महिलेची प्रसूती 

शरद शहारे
बुधवार, 19 डिसेंबर 2018

वेलतूर (जि. नागपूर) - गोसेखुर्द प्रकल्पाच्या योग्य पुनर्वसनासाठी आंदोलनावर असलेल्या कुही तालुक्‍यातील टेकेपारचे महिला व पुरुष जलसत्याग्रह व अन्नत्याग आंदोलनावर आहेत. सोमवारी रात्री आंदोलनस्थळी गरोदर महिलेस प्रसूती वेदना सुरू झाल्या. तिला वेलतूर रुग्णालयात दाखल केल्यावर मुलगा झाला. दोघांची प्रकृती चांगली आहे. 

वेलतूर (जि. नागपूर) - गोसेखुर्द प्रकल्पाच्या योग्य पुनर्वसनासाठी आंदोलनावर असलेल्या कुही तालुक्‍यातील टेकेपारचे महिला व पुरुष जलसत्याग्रह व अन्नत्याग आंदोलनावर आहेत. सोमवारी रात्री आंदोलनस्थळी गरोदर महिलेस प्रसूती वेदना सुरू झाल्या. तिला वेलतूर रुग्णालयात दाखल केल्यावर मुलगा झाला. दोघांची प्रकृती चांगली आहे. 

आंदोलनस्थळी सोमवारी गरोदर असलेल्या सुवर्णा रवींद्र पडोळे हिला प्रसूती वेदना सुरू झाल्या. काही आंदोलकांनी याची माहिती पोलिसांना दिली. आंदोलनस्थळी रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने सुवर्णाला पोलिस वाहनातून वेलतूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. डॉक्‍टरांनी विनाविलंब उपचार सुरू केले. येथे तिने मुलाला जन्म दिला. याची माहिती आंदोलनस्थळी पोहोचताच आंदोलकांनी समाधान व्यक्त केले.

दरम्यान, पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेचेही कौतुक केले जात आहे. आंदोलनाचा मंगळवारी सहावा दिवस होता.  तोडगा  न निघाल्याने ग्रामवासी ऊस, पाणी, वारा व थंडीची पर्वा न करता कुटुंबासह आंदोलनात सहभागी झाले आहेत. रविवार रात्रीपासून दिवसरात्र पावसाची रिपरिप सुरू होती. रात्रभर संपूर्ण वेलतूर परिसरातील वीजपुरवठा खंडित होता,  तरीदेखील आंदोलक अंधाराची, पावसाची वा सरपटणाऱ्या प्राण्यांची भीती न बाळगता नदीपात्रात ठिय्या देऊन आहेत. कुही तालुक्‍यातील रुयाड येथील नागरिकांनी मनोज तितरमारे यांच्या नेतृत्वात टेकेपारवासींच्या आंदोलनाला पाठिंबा दिला.  पुनर्वसनाआधीच  धरणाच्या पाण्याने पिके बुडू लागल्याने नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी अमित तितरमारे यांनी केली. 

लवकर तोडगा काढा
आंदोलकांचे एक शिष्टमंडळ नागपूर येथे जिल्हाधिकारी व तत्सम अधिकाऱ्यांनी बोलाविलेल्या बैठकीला हजर होते. या आंदोलनावर लवकरात लवकर तोडगा काढण्यात यावा, मागण्या मान्य करून बुडणारी रोजी-रोटी थांबवावी. आंदोलनाने चालू शेती हंगाम पार प्रभावित झाला असल्याचे मत काशीनाथ लांजेवार यांनी व्यक्त केले. 

स्वतंत्र महसूल टेकेपार गावाला पुनर्वसनस्थळीही स्वतंत्र गावाचाच दर्जा असावा. रोजगाराची साधने उपलब्ध व्हावीत.
-सोपान पडोळे, टेकेपार

Web Title: women delivery involved in the movement