अकोल्यात अंगावर वीज पडून महिलेचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 एप्रिल 2019

- वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे घडली ही घटना.

पातूर (अकोला) : पातूर तालुक्यातील ग्राम पळसखेड येथील शेतकरी संजय चव्हाण व त्यांची पत्नी लताबाई चव्हाण हे दाम्पत्य शेतातील तुरीचे,गव्हाचे कुटार झाकत असताना काळाने घाला घातला. लताबाई (वय ३५ वर्षे) यांच्या अंगावर वीज पडल्याने जागी ठार झाल्या. ही घटना आज (मंगळवार) दुपारी तीनच्या दरम्यान घडली.

ग्राम पळसखेडमध्ये वातावरणात अचानक बदल होऊन अवकाळी वादळासह पाऊस सुरू झाला. त्यावेळी संजय चव्हाण व त्याची पत्नी शेतातील तुरीचे व गव्हाचे कुटार झाकत असताना वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. पावसाचा जोर वाढला असता कुटार पावसाने ओले होऊ नये म्हणून दोघेजण शेतातील झोपडीकडे धावत जात असताना लताबाई यांच्या अंगावर वीज पडली. यातच त्यांचा दुदैवी मृत्यू झाला.

दरम्यान, या दुर्दैवी घटनेचे वृत्त संपूर्ण गावात व तालुक्यात पसरले. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 

Web Title: A Women Died Due Lighting Collapsed in Akola