असंख्य तक्रारी करूनही जे जमले नाही, ते महिलांच्या एका इशाऱ्याने झाले, वाचा काय झाला प्रकार... 

women gave warning to removed Dump on road
women gave warning to removed Dump on road

पुसद (जि. यवतमाळ) : तालुक्‍यातील बोरी खुर्द येथील दलित वस्तीतील भर रस्त्यावर असलेला उकिरडा प्रशासनाकडे असंख्य तक्रारी करूनही एक वर्षापासून हटत नव्हता. महिला तक्रारी करून थकल्या, अश्रूही गाळले. अखेर धीर एकवटून बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आणि मात्रा लागू पडली. कारवाईचा अंदाज येताच शेवटी गुरुवारी (ता. 9) जेसीबी व ट्रॅक्‍टरने उकिरड्यावरील संपूर्ण कचरा उचलण्यात आला. या लढ्यात अखेर महिलांना यश आल्याने त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. 

बोरी खुर्द येथील दलित वस्तीतील अनिल केशव खंदारे यांनी तयार केलेला शेणाचा उकिरडा अनेक वर्षांपासून भर रस्त्यावर होता. या रस्त्यावरच उर्दू शाळा आहे. अनेकदा विद्यार्थी पाय घसरून या उकिरड्यावर पडले. पावसाळ्यात उकिरड्याची घाण घरात शिरत असल्याने संसर्ग होऊन वस्तीतील नागरिक विशेषत: महिला त्रस्त झाल्या. उकिरड्यामुळे पावसाळ्यात डास आणि इतर कीटकांचा प्रादूर्भाव वाढला. उकिरड्यातून झालेल्या संसर्गामुळे एका मुलाला जीव गमवावा लागला होता. 

त्यामुळे हा उकिरडा हटविण्यासाठी ग्रामपंचायत सरपंच, पोलिस स्टेशन, गटविकास अधिकारी, तहसीलदार अशा सर्व अधिकाऱ्यांच्या कार्यालयात महिलांनी अनेकदा वारी केली. परंतु "उकिरडा रस्त्यातून हटेचिना' हा अनुभव महिलांना आला. त्यामुळे महिला उद्विग्न झाल्या. लोकशाहीच्या या देशात रस्त्यावरील उकिरडा हटविला जाऊ शकत नाही, अशी त्यांची धारणा झाली. उकिरड्याच्या मालकाला विनवणी करून उपयोग नव्हता. उलट शिव्यांचा भडिमार. 

जीवावर उठणारा हा उकिरडा हटवला जाणार नाही, या कल्पनेने त्रस्त झालेल्या महिलांना अश्रू अनावर झाले. अखेर त्यांनी धीर एकवटला व अन्यायाच्या विरुद्ध लढण्याचा इरादा केला. "उकिरडा हटवा, जीव वाचवा' अशी घोषणा करत जिल्हाधिकारी यांना बेमुदत उपोषणाचा इशारा दिला. ही मात्रा बरोबर लागू पडली. गटविकास अधिकारी शिवाजी गवई यांनी तातडीने उकिरडा मालकास बोलवून तंबी दिली. अखेर ग्रामसेवक अनिल येरावार यांच्या देखरेखीत जेपीसी यंत्र व ट्रॅक्‍टरद्वारे उकिरडा हटविण्यात दुपारी आला आणि महिलांनी आपला आनंद साजरा केला. 

संपादित : अतुल मांगे  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com