जागतिक महिला दिन : भारतीय चलनावर महिला, पहा कोणती होती ती नाणी

विवेक मेतकर 
Saturday, 7 March 2020

भारत महिला भारतीय चलनातील नाण्यांवर आतापर्यंत सहा थोर महिलांच्या प्रतिमा छापण्यात आल्या आहेत. 1870 साली राणी व्हिक्टोरिया यांची प्रतिमा असलेली पाच व दहा रुपयांची नाणी चलणात होती. तसेच विदेशी चलनावर महिलांच्या प्रतिमेचे प्रमाण जास्त असल्याची माहिती महिला दिनाच्या निमित्ताने प्रख्यात मुद्रा संग्राहक तथा ‘अक्ष’ करन्सीचे संचालक अक्षय खाडे यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. यातील बरीचशी नाणी व नोटा अक्षयकडे संग्रह केलेल्या आहेत. 

अकोला : भारत महिला भारतीय चलनातील नाण्यांवर आतापर्यंत सहा थोर महिलांच्या प्रतिमा छापण्यात आल्या आहेत. 1870 साली राणी व्हिक्टोरिया यांची प्रतिमा असलेली पाच व दहा रुपयांची नाणी चलणात होती. तसेच विदेशी चलनावर महिलांच्या प्रतिमेचे प्रमाण जास्त असल्याची माहिती महिला दिनाच्या निमित्ताने प्रख्यात मुद्रा संग्राहक तथा ‘अक्ष’ करन्सीचे संचालक अक्षय खाडे यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली. यातील बरीचशी नाणी व नोटा अक्षयकडे संग्रह केलेल्या आहेत. 

भारतीय चलनाबाबत अक्षयने माहिती देताना सांगितले की, इतर देशांमधील चलनी नोटांवर विविधनेत्यांच्या प्रतिमा छापल्या जातात. विदेशी नोटा व नाण्यांवर महिलांच्या प्रतिमा छापण्याचे प्रमाण भारतापेक्षा अधिक आहे. यामध्ये इंग्लंड येथे राणी एलीझाबेथ, ऑस्ट्रेलीया मध्ये राणी एलीझाबेथ द्वितीय, न्युझीलंड येथे केंट शेफर्ड तसेच मेक्सीको,फिलिपाईन्स, चीन, कोरिया, युक्रेन व इतरही देशातील चलनावर महिलांच्या प्रतिमा अधिक आढळून येत असल्याची माहिती अक्षयने दिली. 

Image may contain: 1 person, indoor
अक्षय प्रदीप खाडे

सोन्याचीही नाणी
सन 1870 साली राणी व्हिक्टोरीया यांची प्रतिमा असलेले पाच रुपयांचे सोन्याचेनाणे काढण्यात आले होते. या नाण्याचे वजन 3.88 ग्रॅम होते. तर दहा रुपयांच्या नाण्याचे वजन 7.77 ग्रॅम होते. तसेच ‘वन मोहोर’ नावाच्या पंधरा रुपयांच्या नाण्याचे वजन 11.66 ग्रॅम होते.

1985 साली भारतीय रिजर्व्ह बॅँकेने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची प्रतिमा असलेली 50 पैसे व पाच रुपये किंमतीची नाणी चलणात आणली होती. तसेच स्पेशल एडीशन म्हणून इंदिराजींची प्रतिमा असलेली 20 रुपयांची व 100 रुपये किंमतीची नाणी छापली होती. परंतु, ही नाणी चलनात नव्हती. केवळ स्मृती म्हणून या नाण्यांची निर्मिती करण्यात आली होती.

2009 साली सेंट अल्फोन्सा यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांची प्रतिमा असलेले 100 रुपयांचे नाणे काढले होते. परंतु हे केवळ स्मृती प्रित्यर्थ काढले असल्याने हे नाणे सुध्दा चलनात नव्हते.

2010 ला प्रख्यात समाजसेविका मदर तेरेसा यांच्या स्मृतीत पाच रुपये व शंभर रुपयांचे नाणे काढण्यात आले होते. यापैक केवळ पाच रुपयांचे नाणे चलनात वापरल्या गेले. 100 रुपयांचे नाणे केवळ स्मृती प्रित्यर्थ काढण्यात आले होते. 

2014 साली केरळ मधील गझल गायिका बेगम अख्तर यांच्या स्मृती प्रित्यर्थ शंभर रुपयांचे नाणे काढण्यात आले होते. 

2015 साली मणीपूर येथील राणी गाईन लिव्ह यांच्या स्मृती प्रित्यर्थ पाच रुपये आणि शंभर रुपयांचे नाणे काढण्यात आले होते. यातील पाच रुपयांचे नाणे आजही चलनात आहे. 

2016 साली प्रख्यात संगीतकार एम.एस.सुब्बुलक्ष्मी यांच्या स्मृती प्रित्यर्थ दहा व शंभर रुपयांचे नाणे काढण्यात आले होते. यापैकी दहा रुपयांचे नाणे चलनात आहे.

 

जागतिक महिला दिन


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: women on Indian currency