मशीनमध्ये अडकल्याने महिला कामगार जखमी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 डिसेंबर 2016

टाकळघाट - बुटीबोरी एमआयडीसीतील स्पेंटेक्‍स सीएलसी कंपनीत कामावर असताना एक महिला कामगार मशीनमध्ये अडकल्याने गंभीर जखमी झाली. जखमी महिलेचे नाव प्रतिभा मधुकर तलखंडे (वय 42, खामला, नागपूर) असे आहे. 

टाकळघाट - बुटीबोरी एमआयडीसीतील स्पेंटेक्‍स सीएलसी कंपनीत कामावर असताना एक महिला कामगार मशीनमध्ये अडकल्याने गंभीर जखमी झाली. जखमी महिलेचे नाव प्रतिभा मधुकर तलखंडे (वय 42, खामला, नागपूर) असे आहे. 

प्रतिभा तलखंडे ही महिला कामगार दैनंदिन वेळेनुसार सकाळी साडेसहाच्या सुमारास सुरू होत असलेल्या पाळीमध्ये कामाला आली. ती मशीनवर काम करत असताना तिचे केस व ओढनी मशीनमध्ये अडकली. तिने आरडाओरड केला. पण, प्लांटमधील मशीनच्या आवाजामुळे तिची ओरड कुणालाही ऐकू आली नाही. जवळच्याच मशीनवर काम करत असलेल्या दोन मैत्रिणींना दिसताच मशीन त्वरित बंद करण्यात आली. त्यावेळी त्या महिलेचे शरीर मशीनमध्ये अडकून होते. ते बाहेर काढताच रक्ताचा सडा सांडला. केस व ओढणी मशीनमध्येच अडकून होती. डोक्‍याला कापड बांधून जवळच असलेल्या माया हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. प्रतिभावर प्रथमोपचार करून तिला नागपूरला हलविण्यात आले. तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येते. पुढील तपास एमआयडीसी पोलिस करीत आहेत. 

दोन्ही मैत्रिणी पडल्या बेशुद्ध 

प्रतिभा मशीनमध्ये अडकलेली दिसताच तिच्या दोन मैत्रिणीने त्वरित मशीन बंद करून त्यात अडकलेल्या प्रतिभाला बाहेर काढले. डोक्‍याला जबर मार लागल्याने रक्तबंबाळस्थितीतच तिला माया हॉस्पिटलमध्ये नेताच बघ्यांची गर्दी वाढली. प्रकृती गंभीर पाहून रिता कष्टीस व पुष्पा फ्रान्सिस या दोघीही बेशुद्ध झाल्या. त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यातील पुष्पा फ्रान्सिस या महिलेला एका दिवसागोदर विजेचा शॉक लागला होता. परंतु, सुदैवाने त्यातून ती सुखरूप बाहेर पडली. 

कामगार करतात दबावात काम 

कंपनीच्या दबावत कामगारांना काम करायला लावले जात असल्याचे कामगारांकडून सांगण्यात आले. त्यामुळे अधिक वेळेत काम पूर्ण होण्याचा दबाव असल्याने हा अपघात घडला असावा, असा आरोप कामगार करीत आहेत. कंपनीत एकूण 650 स्थायी कामगार तसेच 1,500 कंत्राटी कामगार काम करतात. एका पाळीच्या आठ तासांमध्ये सहा किलोचा कोण व सहा डम्प बनविणे एका कामगाराला या वेळेत शक्‍य नसले. तरी कंपनी व्यवस्थापन कामगारांवर सक्ती करून काम करवून घेते. काम करतेवेळी कोणत्याच प्रकारची सुरक्षा दिली जात नाही. फक्त सेफ्टी इन्स्पेक्‍टरचा राउंड येतेवेळी सेफ्टी शूज दिले जातात. हा सर्व प्रकार दोन वर्षांपासून सुरू असल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. 

Web Title: Women injured workers stuck in the machine

टॅग्स