खासगी बस उलटून महिला ठार; 53 प्रवासी जखमी

मोर्शी ः बस अपघातस्थळी झालेली प्रवाशांसह नागरिकांची गर्दी.
मोर्शी ः बस अपघातस्थळी झालेली प्रवाशांसह नागरिकांची गर्दी.

मोर्शी (जि. अमरावती) : अंजनगाव-पांढुर्णा खासगी बस येथून दोन किमी अंतरावर मधापुरीजवळ उलटल्याने झालेल्या अपघातात करुणा सोपान मालधुरे (वय 45, रा. बहिरम करजगाव) यांचा जागीच मृत्यू झाला; तर अन्य 53 प्रवासी जखमी झाले.
ही बस अंजनगावसुर्जीच्या रामूसेठ अग्रवाल यांच्या मालकीची आहे. या गाडीमध्ये जवळपास 100 पेक्षा जास्त प्रवासी प्रवास करीत होते. चालक भरधाव वेगात गाडी चालवीत होता. मोर्शीनजीकच्या मधापुरीजवळ वळण घेताना चालकाने ब्रेक दाबल्यामुळे गाडीने दोन कोलांट्या घेतल्या. त्यामुळे हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे.
या अपघातात करुणा मालधुरे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. त्या करजगाववरून लोणीला आपल्या माहेरी जात होत्या. मोर्शी येथील संदीप खेरडे यांच्याकडे लग्न असल्याने करजगाव व शिरजगावकसबा येथील प्रवासी या गाडीमध्ये येत होते. परंतु, अपघात झाल्याने या प्रवाशांना येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. काही गंभीर जखमी प्रवाशांना अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनेत नूरजाबी हदबशहा (वय 60, रा. घाटलाडकी), रफिजा परवीन (वय 50, रा. पांढुर्णा), पूजा विजय ढोले (वय 45, रा. शिरजगावकसबा), राजेंद्र मारोती कवाडे (वय 60, रा. शेंदूरजनाघाट), पुष्पा मारोतराव लोखंडे (वय 45, रा. शेंदूरजनाघाट), भीमराव नारायण चरपे (वय 65, रा. शिरजगावकसबा), चंद्रशेखर उमेश गोरडे (वय 38, रा. सर्फापूर), संजय वामनराव गुल्हाने (वय 45, रा. पुसला), पुरुषोत्तम नारायण दाभाडे (वय 47, रा. शिरजगावकसबा), गौरी पुरुषोत्तम दाभाडे (वय 13, रा. शिरजगावकसबा), जयश्री मंगेश वाढीवकर (वय 40, रा. शिरजगावकसबा), रमेश गणपत आमझरे (रा. देऊरवाडा), शांता चरपे (वय 60, रा. करजगाव), सुधाकर मारोतराव भोसरे (रा. घाटलाडकी), सुभाष शिरभाते (रा. ब्राह्मणवाडाथडी), प्रदीप वानखडे (रा. करजगाव) यांच्यासह अन्य प्रवासी जखमी झाले. किरकोळ जखमींवर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.
दरम्यान, पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com