अस्वलाच्या हल्ल्यात महिला गंभीर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 जुलै 2019

चिखलदरा (जि. अमरावती) : अस्वलाने केलेल्या हल्ल्यात मंगराय लाला बेलसरे (वय 40) ही महिला गंभीर जखमी झाली. गुरुवारी (ता. 25) सकाळी सात वाजताच्या सुमारास मेळघाट व्याघ्रप्रकल्पांतर्गत येणाऱ्या बागलिंगा गावात ही घटना घडली. जखमी महिलेची प्रकृती गंभीर असल्याने तिला नागपूरला हलविले आहे.

मंगराय घराबाहेर पडली असताना तिच्यावर अस्वलाने अचानक झडप घेतली. त्यात तिच्या शरीराचे अस्वलाने अनेक लचके तोडल्यामुळे ती गंभीर जखमी झाली. तिला ग्रामस्थांनी प्रथम चिखलदरा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर प्रकृती अधिक खालावल्याने तिला नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविले आहे. वनाधिकाऱ्यांनी जखमी महिलेची चौकशी केली. काही दिवसांपासून चिखलदरा परिसरात अस्वलांची संख्या वाढली आहे. पंधरा दिवसांपूर्वी एका पर्यटकावर अस्वलाने हल्ला केला होता. त्यानंतरची ही दुसरी घटना आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Women serious in bear attack