लग्नाचे आमिष दाखवून महिलेचे दीड वर्ष लैंगिक शोषण

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 एप्रिल 2019

शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन ४४ वर्षीय आरोपीने ३९ वर्षीय पीडितेवर अत्याचार केला. या घटनेनंतर लग्नाचे आमिष दाखवून तो सतत दीड वर्ष पीडितेचे लैंगिक शोषण करीत राहिला. सीताबर्डी पोलिसांनी अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे.

नागपूर - शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन ४४ वर्षीय आरोपीने ३९ वर्षीय पीडितेवर अत्याचार केला. या घटनेनंतर लग्नाचे आमिष दाखवून तो सतत दीड वर्ष पीडितेचे लैंगिक शोषण करीत राहिला. सीताबर्डी पोलिसांनी अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे.

आरीफ अब्दुल कादीर शेख (४४) रा. इतवारा बाजार असे आरोपीचे नाव आहे. तो रामदासपेठेतील ट्रॅव्हल टॅग कारवथ कव्हर मोअर असिस्ट कंपनीत कामाला आहे. याचप्रमाणे पीडिता गीतांजली टॉकीजजवळील टूर्सच्या कार्यालयात कामाला होती. इन्शुरन्सच्या कामानिमित्त आरोपी नियमित तिच्या कार्यालयात जायचा. मे २०१७ मध्ये त्याने पीडितेला आपल्या कार्यालयात बोलावून घेतले. तिला शीतपेयातून गुंगीचे औषध दिले. कार्यालयातच तिच्यावर अत्याचार केला. ती शुद्धीवर येताच कुठेही घटनेची वाच्यता न करण्याचा इशारा दिला. 

या घटनेनंतर लग्नाचे आमिष देऊन तो सातत्याने अत्याचार करीत राहिला. वाट्टेल तेव्हा तिला आपल्या कार्यालयात बोलावून घ्यायचा. आरोपी फसगत करीत असल्याचे लक्षात येताच पीडितेने पोलिसात तक्रार दिली. सीताबर्डी पोलिसांनी अत्याचाराचा गुन्हा दाखल करीत प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

Web Title: Women Sexual Abuse Crime Marriage Cheating