अद्यात व्यक्तीकडून महिलेची डोक्यात वार करून हत्या

एटापल्ली तालुक्यातील एटापल्ली बाजारपेठेत सागर फोटो स्टुडिओमध्ये मंगळवार (ता. २४) पहाटे 3 वाजताच्या सुमारास अद्यात व्यक्तीकडून महिलेची डोक्यात वार करून हत्या करण्यात आली.
Kanika Biswas
Kanika BiswasSakal
Summary

एटापल्ली तालुक्यातील एटापल्ली बाजारपेठेत सागर फोटो स्टुडिओमध्ये मंगळवार (ता. २४) पहाटे 3 वाजताच्या सुमारास अद्यात व्यक्तीकडून महिलेची डोक्यात वार करून हत्या करण्यात आली.

एटापल्ली (जि. गडचिरोली) - एटापल्ली तालुक्यातील एटापल्ली बाजारपेठेत सागर फोटो स्टुडिओमध्ये मंगळवार (ता. २४) पहाटे 3 वाजताच्या सुमारास अद्यात व्यक्तीकडून महिलेची डोक्यात वार करून हत्या करण्यात आली. कनिका जय बिस्वास (वय ३१), असे मृत महिलेचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार मृत कनिका बिस्वास हिचे पती बाहेरगावी कामानिमित्त गेले असता घरीच असलेल्या दुकानात कनिका झोपून असताना अज्ञात व्यक्तीने लोखंडी वस्तूने तिच्या डोक्यात वार करून पळ काढला. सकाळी १० वाजता बाहेरगावावरून परत आलेले जय बिस्वास यांनी दुकानातील कुलूप व कुंडी उघडी आत प्रवेश केला असता पत्नी कनिका रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. त्यांनी शेजारी तसेच पोलिसांना माहिती दिली असता पोलिसांनी गुन्हा नोंद केला. पुढील तपास पोलिस निरीक्षक विजयानंद पाटील, सहायक पोलिस निरीक्षक मंदार पुरी करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com