मुलाला मारून आईची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मार्च 2017

मोर्शी (जि. अमरावती) - पोटच्या पाच वर्षांच्या मुलाचा गळा दाबून त्याची हत्या केल्यानंतर आईने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी (ता.१४) दुपारी चारच्या सुमारास असरानी ले-आउट येथे घडली. जयश्री दिनेश भांबूरकर (वय ४०) व वेदांत भांबूरकर, अशी मृत मायलेकांची नावे आहेत. 

येथील सिंभोरा रोडस्थित असरानी ले-आउटमधील शिक्षक दिनेश गोपाळराव भांबूरकर हे दहावी परीक्षेबाबत सभा असल्याने सकाळीच ११ वाजता अमरावतीला निघून गेले. त्यानंतर दुपारी साडेचारच्या सुमारास घरी परत आले. बाहेरून घराचे दार बंद असल्याचे दिसले. श्री. भांबूरकर यांनी बाहेरून आवाज दिला; मात्र आतून प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी शेजारच्यांच्या मदतीने दार उघडल्यावर हा प्रकार दिसून आला. पत्नी जयश्री भांबूरकर ही पंख्याला दुपट्ट्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली; तर पाच वर्षीय लहानगा मुलगा वेदांत भांबूरकर हा पलंगावर मृतावस्थेत आढळून आला. झालेल्या प्रकाराने हादरून गेलेल्या शेजाऱ्यांनी तत्काळ मोर्शी पोलिस ठाण्याला घटनेची माहिती दिली. 

मोर्शी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक चव्हाण यांनी घटनास्थळ  गाठून दोघांचेही मृतदेह तपासणीसाठी मोर्शीच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठविले. झालेल्या घटनेमुळे सर्व परिसरात खळबळ उडाली असून नानाविध तर्कवितर्क काढले जात  आहेत. भांबूरकर दाम्पत्याला अजून दोन मुली आहेत. एक मोठी मुलगी नूतन ही शिवाजी हायस्कूलला नववीत आहे. लहान अंतरा ही जिल्हा परिषदेच्या शाळेत चौथ्या वर्गात शिकत आहे.

घटनेदरम्यान या दोन्ही मुली शाळेत गेल्या होत्या. मोर्शी पोलिस ठाण्याचे ठाणेदार नंदकिशोर शर्मा यांच्या मार्गदर्शनात पोलिस तपास करीत आहेत.

Web Title: women suicide