विद्यापीठ शारीरिक शिक्षण विभागात महिलाराज - डॉ. कल्पना जाधव

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 मार्च 2017

नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण विभागासाठी सोमवारचा (ता. सहा) दिवस ऐतिहासिक ठरला.

विभागाच्या प्रभारी संचालकपदी हिस्लॉप महाविद्यालयाच्या क्रीडाविभाग प्रमुख डॉ. कल्पना जाधव यांची नियुक्‍ती करण्यात आली. विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागात दोन्ही महत्त्वपूर्ण पदांवर महिलांची नियुक्‍ती होण्याची ही पहिलीच वेळ होय. यानिमित्ताने डॉ. जाधव यांना महिलादिनाची अविस्मरणीय भेट मिळाली आहे.

प्रभारी संचालक रवींद्र पुंडलिक निवृत्त झाल्यामुळे विद्यापीठाने त्यांच्या जागी डॉ. जाधव यांची प्रभारी संचालक म्हणून नियुक्‍त केली. तशा आशयाचे पत्र कुलसचिव डॉ. पुरणचंद्र मेश्राम यांनी डॉ. जाधव यांना पाठविले.

त्याचवेळी पुंडलिक यांनाही सेवानिवृत्त करण्यात येत असल्याचे पत्र मिळाले. नियुक्‍तीचे पत्र मिळाल्यानंतर डॉ. जाधव यांनी विभागात जाऊन पुंडलिक यांच्याकडून पदभार स्वीकारला. शारीरिक शिक्षण विभागाच्या आतापर्यंतच्या इतिहासात प्रथमच एक महिला संचालकपदी आरूढ होणार आहे. याशिवाय विद्यापीठात एकाचवेळी दोन महत्त्वपूर्ण पदांवर महिलांची नियुक्‍ती होण्याचीही ही पहिलीच वेळ असणार आहे. विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभागप्रमुख म्हणून सध्या डॉ. माधवी मार्डीकर या काम पाहात आहेत. डॉ. जाधव यांना हिस्लॉप महाविद्यालयाच्या क्रीडाविभाग प्रमुख आणि प्रभारी संचालक अशी दुहेरी भूमिका पार पाडावी लागणार आहे. पुंडलिक यांनी गेल्या वर्षी जुलैमध्ये सेवानिवृत्त संचालक डॉ. धनंजय वेळूकर यांच्याकडून प्रभारी संचालक म्हणून कार्यभार स्वीकारला होता.  

नव्या जबाबदारीबद्दल शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या व माजी राष्ट्रीय फुटबॉलपटू असलेल्या डॉ. जाधव म्हणाल्या, विद्यापीठाची पहिली महिला संचालक होण्याचा बहुमान माझ्यासाठी खूप मोठा आहे. मी खेळाडू आणि शिक्षक म्हणून गेली ४० वर्षे केलेल्या प्रामाणिक कार्याची ही एकप्रकारे पावतीच म्हणावी लागेल. नवी जबाबदारी अर्थातच माझ्यासाठी फार मोठे चॅलेंज राहणार आहे. या पदाला न्याय मिळवून देण्याचा नक्‍कीच मी प्रयत्न करेल. मला या कामात विभागातील इतर कर्मचाऱ्यांचेही सहकार्य लागणार आहे. खेळाडूंच्या अडचणी सोडविणे तसेच विद्यापीठाच्या खेळाचा आलेख उंचावणे, या गोष्टींना प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

Web Title: women in University of Physical Education Department