महिलांचे दारूबंदीसाठी मतदान

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 मे 2018

जलालखेडा - नरखेड तालुक्‍यातील खैरगावनंतर भिष्णूर येथील महिलांनी गावातील देशी दारूचे दुकान बंद व्हावे, यासाठी लढा उभारला. मंगळवारी (ता. २९) भिष्णूर येथे यादरम्यान निवडणूक पार पडली. महिलांनी भर उन्हात मतदान केले. पण, मतदान झाल्यानंतर लगेच मतमोजणी होऊन निकाल लागेल, अशी अपेक्षा होती; परंतु मतमोजणी झाली नाही. याचा निकाल केव्हा लागेल हे कोणी सांगायला तयार नाही. निकालाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याची गावात चर्चा सुरू झाली. 

नरखेड तालुक्‍यातील भिष्णूर या गावात वॉर्ड क्रमांक ४ मध्ये परवानाधारक देशी दारूचे दुकान आहे. हे दुकान काटोल येथील कुसुम रेवतकर यांच्या नावाने आहे. या दुकानामुळे गावातील सामाजिक वातावरण बिघडत असल्याची तक्रार होती.
मंगळवारी (ता.२९) भिष्णूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत निवडणूक झाली. निवडणुकीसाठी गावातील मतदानास पात्र अशा ११३२ महिला मतदारांची यादी तयार करण्यात आली होती. ‘आडवी बाटली, उभी बाटली’ असे चिन्ह देण्यात आले. मतदान सायंकाळी ५ वाजता संपले. मतमोजणी होऊन निकाल जाहीर होईल, अशी अपेक्षा होती. पण, तसे न झाल्याने सर्वांची घोर निराशा झाली. यामुळे या निकालाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याची गावात चर्चा पसरली.

निवडणूक तहसीलदारांच्या नेतृत्वात महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पार पाडली. या वेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारीही उपस्थित होते.

झालेले मतदान
महिला - ११३२ 
हक्‍क बजाविला  - ६०८

Web Title: women voting for liquor ban