आम्ही सारे नयनतारा...

सुशांत सांगवे
शुक्रवार, 11 जानेवारी 2019

यवतमाळ : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सत्रात ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल अचानक आल्या तर...? त्या प्रत्यक्ष येणार नसल्या तरी त्यांचे मास्क बांधून काही महिला साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यास येणार आहेत. तर दुसरीकडे सहगल यांच्या भाषणाची प्रत संमेलनस्थळी रसिकांना देण्यासाठी काही तरुणांनी पुढाकार घेतला आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन सहगल यांच्या हस्ते होणार होते. मात्र, त्यांच्या नावाला विरोध झाल्याने आयोजकांनी ई-मेल पाठवून सहगल यांना संमेलनाला येऊ नका, असे सांगितले. या निमंत्रणवापसी वरून आयोजक आणि महामंडळावर चौफेर टीका झाली. वाद आणखी वाढू नये सहगल यांचे भाषण ही वाचून दाखवायचे नाही, असा निर्णय या दोन्ही संस्थांनी घेतला आहे.

या पार्श्वभूमीवर त्यांचे मास्क बांधून संमेलनस्थळी येण्याचा निर्णय काही महिलांनी घेतला आहे. या माध्यमातून 'आम्ही सारे नयनतारा' हाच संदेश या महिला देणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, याच वेळी पुण्या-मुंबईतून आलेल्या काही तरुणांनी नयनतारा यांच्या भाषणाच्या प्रति संमेलनस्थळी वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी लोकवाड्मय गृहाने त्यांना दोन हजार प्रति मोफत छापून दिल्या आहेत.

Web Title: women wears Mask of anayantara Sehegal at Marathi Sahitya Sammelan