बाळापूर तालुक्यात 11 जागांवर महीलांचे राज्य

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

बाळापूर : बाळापूर पंचायत समितीच्या 14 जागांसाठी तर जिल्हा परिषदेच्या 7 जागांसाठी आज सोमवारी आरक्षण जाहीर झाले. बाळापूर येथील तहसील कार्यालयात ही प्रक्रिया पार पडली. पंचायत समितीच्या 14 गणांपैकी 7 जागा तर जिल्हा परिषदेच्या 4 जागा महीलांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. आरक्षणामुळे इच्छुकांचे मनसुबे धुळीस मिळाले आहेत. परिणामी सर्वाधिक फटका पुरुषांना बसला आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समितीसह 11 पदे महिलांच्या वाटणीला जाणार असल्याने बाळापूर तालुक्यात महिलाराज येणार हे निश्‍चित झाले आहे. उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, निवडणूक निर्णय अधिकारी सोनवणे व तहसीलदार दिपक पुंडे यांच्या उपस्थितीत आज सकाळी 11 वाजता आरक्षण सोडतीला सुरवात झाली. आरक्षणाच्या चिठ्ठया काढण्यासाठी विद्यार्थ्यांना पाचारण करण्यात आले. आरक्षण जाहीर होताच तालुक्यात उमेदवारीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. कोणाला कुठून संधी मिळणार आणि कोण कुणा विरोधात लढणार याचीच चर्चा आज दिवसभर ऐकायला मिळत होती.

Web Title: women win 11 seats in Balapur taluka