Women;s Day 2019 ग्रामीण भागातील मुलींची जपली ‘अस्मिता’

Asmita-Sanitary-Napkin
Asmita-Sanitary-Napkin

महिला दिन 2019  
नागपूर - मागील वर्षी महिलादिनाच्या पार्श्‍वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या अस्मिता योजनेला ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ग्रामीण भागातील मुलींची ‘अस्मिता’ या आरोग्य योजनेमुळे जपली जात आहे. ग्रामीण भागातील किशोरवयीन मुलींना पाच रुपयांत आठ सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्याकरिता राज्य सरकारतर्फे सुरू करण्यात आलेल्या अस्मिता योजनेला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या ॲपवर १० हजारांच्या वर किशोरवयीन मुलींनी नाव नोंदणी केली आहे. 

ग्रामीण भागातील किशोरवयीन मुलींना अवघ्या पाच रुपयांत आठ सॅनिटरी नॅपकिन देण्याच्या ग्रामविकास विभागाच्या अस्मिता योजनेचा शुभारंभ मागील वर्षी ८ मार्च २०१८ रोजी आंतरराष्ट्रीय महिलादिनी झाला. 

या योजनेतून जिल्हा परिषद शाळांमधील ११ ते १९ वयोगटातील किशोरवयीन मुलींना सॅनिटरी नॅपकिनच्या आठ पॅडचे एक पाकीट पाच रुपयांत मिळत आहे. ही सवलत अस्मिता कार्डधारक मुलींना मिळत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थिनींमध्ये मासिक पाळीदरम्यान स्वच्छतेबाबतची जागरूकता कमी बघावयास मिळते. वैयक्तिक स्वच्छतेबाबत जाणीव मोठ्या प्रमाणात यावी, यासाठी अस्मिता योजनेद्वारे सरकार मुलींना व महिलांना स्वस्त दरात सॅनिटरी पॅड देण्यात येत आहेत. यासाठी ॲपवर नोंदणी करता येते. याशिवाय ज्यांना या योजनेत आर्थिक सहकार्य करायचे आहे. त्यांच्यासाठी ही ऑनलाइन पेमेंटची सुविधा आहे. नॅपकिनचा पुरवठा करण्याची जबाबदारी बचतगटांना देण्यात आली आहे. 

मासिक पाळीबाबत आजही ग्रामीण भागात अनेक गैरसमज आहेत. महिलांना मासिक पाळी आल्यानंतर घराच्या बाहेर ठेवले जाते. पॅड महाग असल्यामुळे अनेक महिला पॅडऐवजी कपड्याचा वापर करतात. त्यामुळे त्यांना त्वचेचे रोग होण्याची शक्‍यता असल्याने, अस्मिता योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील महिलांना २४० मिमी. आकाराची सॅनिटरी नॅपकिन २४ रुपये तसेच २८० मिमी आकाराची सॅनिटरी नॅपकिन २९ रुपयाला देण्यात येत आहे.

तीन लाख शाळांची नोंदणी 
राज्यभरात पहिल्या टप्प्यात सात लाख मुलींना अस्मिता कार्ड वाटप केले आहे. आतापर्यंत देशभरातील ३.१३ लाख जिल्हा परिषद शाळेतील मुलींची नोंदणी झाली. महाराष्ट्रात नोंदणी केलेल्या समूहांची संख्या नागपूर विभागात ३ हजार २४६, नाशिक विभागात २ हजार ८२८,  पुणे विभागात २ हजार ८२८, अमरावती विभागात २ हजार ५९५, औरंगाबाद विभागात ३ हजार १५३ तर, कोकण विभागात १ हजार ९५६ आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com