उपराजधानीत महिलेचा सायकलवर योग!

file photo
file photo

नागपूर  : खडबडीत रस्त्यावर सायकल चालविणे, हे तसेही खूप जिकरीचे काम आणि त्यात सायकलवर तोल सांभाळून योग करणे त्याहून अवघड. नागपूरच्या मंगला पाटील ही दोन्ही कामे तेवढ्याच सफाईदारपणे करतात. गेल्या अनेक वर्षांपासून त्या नियमित योगसाधना करून पर्यावरण रक्षणाचा अनोखा संदेश देताहेत.
निरोगी व सुदृढ आयुष्यासाठी नियमित योग हा सर्वोत्तम पर्याय मानला जातो. साधारणपणे योग जमिनीवर बसून केला जातो. मात्र मंगला यांनी "कुछ हट के' करीत "सायकल योग' हा नावीन्यपूर्ण प्रकार विकसित केला. गेल्या कित्येक वर्षांपासून त्या नियमितपणे सायकलवर योग करीत आहेत. मंगला यांचा दिनक्रम भल्या पहाटे "सायकल योग'ने सुरू होतो. त्या सायकल चालवतानाच चक्क हॅण्डलचे दोन्ही हात सोडून अनुलोम- विलोम व योगाचे विविध प्रकार मोठ्या सफाईदारपणे करतात. कधी जोरजोरात हात हलवतात, तर कधी पायाच्या करामती करतात. हा योगाभ्यास सुरू असताना त्यांची सायकल चालविण्याची प्रक्रिया निरंतर सुरू असते. सायकलचे हॅंडल व तोल सांभाळून व रस्त्यावर दोन्ही हात सोडून सायकल चालविणे निश्‍चितच सोपी गोष्ट नाही. मात्र मंगला यांनी नियमित सरावाने ही कला सहज अवगत केली. गेल्या 20 वर्षांपासून त्या दररोज एक ते दीड तास सायकलवर योग करतात. योग करताना त्यांचा एकवेळा अपघातसुद्धा झाला. मात्र, त्यांची जिद्द सायकलवर योग करण्यापासून त्यांना थांबवू शकली नाही. रस्त्याने व्यायामासाठी किंवा फिरायला येणारे नागरिक त्यांचा "सायकल योग' पाहून अचंबित होतात. आपण करीत असलेला हा योगप्रकार मंगला यांना इतरांपर्यंतही पोहोचवायचा आहे. मात्र, तो वाटते तितका सोपादेखील नाही. त्यासाठी प्रचंड योगसाधना व भरपूर सराव लागतो. समाजासाठी आदर्श उदाहरण ठरलेल्या मंगला सायकलवर योगसाधना करून स्वत:च्या आरोग्याची तर काळजी घेत आहेतच, शिवाय पर्यावरण रक्षणाचा अनोखा संदेशही देताहेत. आंतरराष्ट्रीय योगदिनीही त्यांनी सायकलवर योगसाधना करून नागपूरकरांचे लक्ष वेधले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com